Diwali 2025: दिवाळी पार्टी आणखी होणरा खास, आजच खरेदी करा हे 5 बेस्ट Bluetooth स्पीकर्स, मिळणार दमदार साउंड आणि शानदार वाइब्स
दिवाळी पार्टीसाठी ब्लूटूथ स्पीकर शोधत आहात का? तर आता आम्ही तुम्हाला 5 अफोर्डेबल स्पीकर्सबद्दल सांगणार आहोत. हे असे स्पीकर्स आहेत, जे जबरदस्त साउंड, धमाकेदार बेस आणि परफेक्ट वाइब्स ऑफर करतात. या स्पीकर्समुळे तुमची दिवाळी पार्टी आणखी खास होणार आहे. दिवाळीची सजावट, मिठाई आणि रांगोळीसह ब्लूटूथ स्पीकर्स देखील तुमच्या दिवाळी पार्टीची शोभा वाढवणार आहेत. एक दमदार Bluetooth Speaker तुमची पार्टी आणखी खास बनवतो. आता आम्ही तुम्हाला अशा स्पीकर्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांची साउंड क्वालिटी, बॅटरी बैकअप आणि किंमत तिन्ही परफेक्ट आहे. चला तर मग या ब्लूटूथ स्पीकर्सबद्दल जाणून घेऊया, ज्यामुळे तुमची पार्टी आणखी खास होणार आहे.
जर तुम्ही डीप बेस आणि क्लियर साउंडवाला पोर्टेबल स्पीकर शोधत आहात, तर JBL Flip 6 एक चांगला ऑप्शन ठरणार आहे. या स्पीकरमध्ये Dual Passive Radiators आणि Harman चा एडवांस एल्गोरिदम देण्यात आला आहे, जो म्यूजिक आणखी इम्पॅक्टफुल बनवतो. तुम्ही JBL Portable App द्वारे साउंड कस्टमाइज करू शकतो. या स्पीकरची किंमत Amazon वर 7,499 रुपये आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Boat चे हे मॉडल लाइटिंग आणि साउंड दोन्हीसह पार्टीसाठी एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. या डिव्हाईसमध्ये 60W Signature Sound, दोन EQ मोड्स आणि 7 कलर एलईडी प्रोजेक्शन लाइट्स देण्यात आले आहे. ज्यामुळे पार्टी वाइब्स सेट केल्या जाऊ शकतात. तुम्ही Boat Stone Lumos Amazon वरून 4,299 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता.
Sony चा हा स्पीकर अशा लोकांसाठी बेस्ट ठरणार आहे, जे बास-लवर्स आहे. या डिव्हाईसमध्ये एक वेगळं ULT बटन देण्यात आलं आहे, जे बासला अधिक डीप करते. Sony ची क्वालिटी आणि डिटेलिंग यामुळे दिवाळी पार्टी परफेक्ट बनते. Amazon वरून तुम्ही हे स्पीकर्स 7,990 रुपयांत खरेदी करू शकता.
कमी बजेटमध्ये हाय पावर साउंड पाहिजे असेल तर ZEBRONICS Zeb-Sound Feast 500 सर्वात चांगला ऑप्शन ठरणार आहे. हा स्पीकर 70W साउंड आउटपुट, RGB लाइट्स, वॉइस असिस्टेंट सपोर्ट आणि इनबिल्ट माइक्रोफोनसह उपलब्ध आहे. हा ब्लूटूथ स्पीकर 2,999 रुपयांचया किंंमतीत खरेदी केला जाऊ शकतो.
JBL Charge 5 हा प्रिमीयम आणि विश्वसनीय स्पीकर आहे. यामध्ये JBL Original Pro Sound, डीप बेस आणि 20 तासांची बॅटरी लाईफ देण्यात आली आहे. जर तुम्हाला पार्टी शांत हवी असेल तर हा स्पीकर तुमच्यासाठी योग्य आहे. त्याची किंमत सुमारे 15,000 रुपये आहे.