'या' भाज्यांमध्ये चुकूनही टाकू नका टोमॅटो, अन्यथा बिघडून जाईल पदार्थाची चव
मेथीची भाजी किंवा हिरव्या पालेभाज्या बनवताना त्यात अजिबात टोमॅटोचा वापर करू नये. यामुळे भाजीची टेस्ट खराब होऊन जाते. टोमॅटोमधील आंबटपणामुळे पालेभाज्यांची नैसर्गिक चव खराब करून टाकतो.
दुधी भोपळ्याची भाजी चवीला हलकीशी गोडसर असते.तसेच भाजीमध्ये पाण्याचे प्रमाण सुद्धा जास्त असते. त्यामुळे भाजीत टोमॅटो टाकू नका, कारल्याच्या भाजीमध्ये सुद्धा टोमॅटो अजिबात वापरू नये.
भेंडीमध्ये टोमॅटो घातल्यास भाजी आणखीनच चिकट होते. त्यामुळे तुम्हाला जर कुरकुरीत भेंडी खाण्यास हवी असेल तर त्यात कांदा घालावा. टोमॅटोचा वापर अजिबात करू नये.
दह्यापासून बनवलेल्या पदार्थांमध्ये टोमॅटो घालणे टाळावे. दही आणि टोमॅटो आंबट असल्यामुळे पदार्थाची चव बिघडते. याशिवाय दही खराब होते.
कोणत्याही कडधान्याच्या भाजीमध्ये टोमॅटोचा वापर करू नये. पदार्थाची चव कायमच टिकवून ठेवण्यासाठी कडधान्याच्या भाजीमध्ये कांदा खोबऱ्याचे वाटण टाकावे.