अनेक लोक सकाळी लवकर उठल्यानंतर चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन करतात. वाढलेले वजन कमी करणे, त्वचा चमकदार करण्यासाठी आणि इतर अनेक गोष्टींसाठी चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन केले जाते. लहान आकाराच्या बारीक बिया चवीसोबत आरोग्यासाठीसुद्धा अतिशय प्रभावी ठरतात. पण चिया सीड्स आरोग्यासाठी जितक्या चांगल्या आहेत, तितक्याच वाईट सुद्धा आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या लोकांनी उपाशी पोटी चिया सीड्सचे पाणी पिऊ नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
रिकाम्या पोटी 'या' लोकांनी चुकूनही करू नका Chia Seeds च्या पाण्याचे सेवन
वारंवार गॅस, पोटफुगी किंवा बद्धकोष्ठता इत्यादी समस्यांपासून त्रस्त असलेल्या लोकांनी चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन करू नये. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते. ज्यामुळे तुम्हाला आतड्यांसंबंधित समस्या वाढू शकतात.
चिया सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड शरीरात वाढलेला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. पण रिकाम्या पोटी चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे तुमचा रक्तदाब आणखीनच कमी होत असेल तर चिया सीड्सचे पाणी पिऊ नये.
तीळ, मोहरी किंवा पुदिना इत्यादी पदार्थांचे सेवन केल्यामुळे तुम्हाला ऍलर्जी होत असेल तर चिया सीड्सचे सेवन करू नये. यामुळे तुम्हाला त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
रक्त पातळ होण्याची औषध चालू असल्यास चिया सीड्स खाणे टाळावे. दोन्ही गोष्टी एकत्र खाल्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात.
अनेकांना चिया सीड्स गिळताना त्रास होतो. त्यामुळे आरोग्यासंबंधित कोणत्याही समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी चिया सीड्सचे सेवन अजिबात करू नये.