सिंधुदुर्ग येथे ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना जोरदार टोला लगावला. त्यांनी म्हटले की, “ठाकरे ब्रँड कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे.” वैभव नाईक यांनी पुढे सांगितले की २००९ च्या लोकसभा निवडणुकीतील यश हे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामुळेच मिळाले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी ६३ आमदार निवडून आणले आणि आजही तेच ठाकरे ब्रँड सक्षमपणे चालवत आहेत. “जोपर्यंत उद्धवजी आणि आदित्य ठाकरे आहेत, तोपर्यंत ठाकरे ब्रँड टिकून राहणार,” असा ठाम दावा त्यांनी केला.