जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा 'या' भाज्यांचा समावेश
कोहळ्यात विटामिन सी, फायबर, लोह इत्यादी अनेक घटक असतात. याशिवाय कमी कलरिजयुक्त कोहळा सहज पचन होतो. कोहळ्याच्या वरील साल काढून मध्यम आकारात तुकडे करून भाजी बनवू शकता.
दुधी भोपळ्याची भाजी लहान मुलांसह मोठ्यांना सुद्धा खायला आवडत नाही. पण या भाजीमध्ये असलेले गुणकारी घटक पित्त कमी करतात आणि वाढत्या अपचनाच्या समस्येपासून सुटका मिळवून देतात.
पित्तदोष कमी करण्यासाठी पडवळ खावे. हिरव्या मिरचीमध्ये बनवलेली पडवळ भाजी चवीला अतिशय सुंदर लागते. याशिवाय पडवळ भाजी सहज पचन होते.
ॲसिडीटीचा त्रास असणाऱ्या लोकांनी आठवड्यातून एकदा तरी गिलक्यांची भाजी खावी. या भाजीमध्ये असलेले शीत गुणधर्म अपचनाचा त्रास कमी करतात.
शरीरात वाढलेले पित्त कमी करण्यासाठी भोपळ्याची भाजी खावी. भोपळ्यापासून बनवलेले विविध पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात.