शरीरात युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. सांध्यांमध्ये वेदना होणे, सूज, असंवेदनशीलता, किडनी स्टोन होऊन संपूर्ण शरीराच्या कार्यात बिघाड होतात. त्यामुळे युरिक ॲसिडची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. जीवनशैलीत सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. चला तर जाणून घेऊया शरीरात युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा.(फोटो सौजन्य – istock)
सांध्यांना कायमच सूज येते? मग युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

दिवसभरात कमीत कमी ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याच्या सेवनामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. याशिवाय आहारात विटामिन सी युक्त लिंबू, आवळा, संत्री इत्यादी फळांचा समावेश करावा.

रात्री मूठभर ओवा आणि दोन सुके अंजीर पाण्यात भिजवून ठेवावेत. त्यानंतर सकाळी उठल्यावर पाण्यासहीत सर्व पदार्थ खावेत. यामुळे युरिक ॲसिड आणि कडकपणा कमी होण्यास मदत होते.

भाजलेल्या अळशीच्या बियांची पावडर कोमट पाण्यात मिक्स करून प्यावी. यामुळे सांध्यांमध्ये जमा झालेले युरिक ॲसिड बाहेर पडून जाण्यास मदत होईल आणि आरोग्य सुधारेल.

आहारात इतर पदार्थांसोबतच पालेभाज्यांचा सुद्धा समावेश करावा. पालेभाज्यांमध्ये शरीरातील टॉक्सिन्स शोषून घेणारे नैसर्गिक घटक असतात. ज्यामुळे सांध्यांमधील वेदना कमी होतात.

रात्री झोपण्यापूर्वी एरंडेल किंवा महानारायण तेलाने पायाच्या तलव्यांची आणि सांध्यांची मालिश करावी. मालिश करताना जास्त जोर देऊ नये. हलक्या हाताने मालिश केल्यास रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल.






