पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात वेगवेगळ्या भाज्या उपलब्ध होतात. भाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. या दिवसांमध्ये साथीच्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो आणि संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते. सर्दी, खोकला, ताप किंवा आरोग्यासंबंधित इतर समस्या उद्भवल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते आणि खूप जास्त थकवा येतो. त्यामुळे पावसाळ्यात बाजारात उपलब्ध असलेल्या या भाज्यांचे आवर्जून सेवन करावे. यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. (फोटो सौजन्य – istock)
पावसाळ्यात खालेल्या 'या' भाज्यांमुळे वर्षभर राहाल तंदुरुस्त आणि फिट, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच आजार होतील गायब

गोडसर चवीचा लाल भोपळा शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. यामध्ये विटामिन ए, अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी भोपळ्याची भाजी खावी.

पावसाळ्यात पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात सहज पचन होणाऱ्या भाज्या खाव्यात. यामध्ये आवर्जून दुधी भोपळा खावा, दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते.

पावसाळ्यात दोडक्याच्या भाजीसोबतच दोडक्याच्या सालींची चटणी सुद्धा खावी. यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि वारंवार अपचनाचा त्रास उद्भवत नाही.

मूळव्याधीच्या त्रासाने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात सुरण खावा. शिजवलेला सुरण खाल्ल्यास मूळव्याधीच्या त्रासापासून सुटका मिळते आणि आरोग्य चांगले राहते.

गणपती बाप्पाच्या नैवेद्यात आवर्जून परवलची भाजी बनवली जाते. त्यामुळे पावसाळ्यात वरील भाज्यांचे आवर्जून सेवन करावे.






