पीएमपीएमएलची पाच बसस्थानके स्थलांतरित (फोटो- सोशल मिडिया)
विसर्जन मिरवणुकीमुळे शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता आणि कर्वे रस्ता हे प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे या मार्गांवरील बसचे मूळ थांबे बदलण्यात आले आहेत. शाहू महाराज बसस्थानक (स्वारगेट) येथून सातारा रस्त्याने कात्रज, कोंढवा, अप्पर आणि मार्केट यार्डकडे जाणाऱ्या बस लक्ष्मी नारायण चौक येथून सोडण्यात येतील. नटराज बसस्थानकाऐवजी सिंहगड रस्त्याकडे जाणाऱ्या बस पर्वती पायथा (स्वामी समर्थ मठ) येथून धावतील.
स्वारगेट स्थानकाबाहेरून सोलापूर रस्त्याने हडपसरकडे जाणाऱ्या तसेच भवानी पेठ, नाना पेठ आणि रास्ता पेठकडे जाणाऱ्या बस वेगा सेंटरजवळून सोडण्यात येतील. डेक्कन जिमखाना बसस्थानकाऐवजी कोथरूड डेपो, माळवाडी आणि एनडीए गेटकडे जाणाऱ्या बस एस.एन.डी.टी. कॉलेजजवळून धावतील.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक व्यवस्थेनुसार बसच्या मार्गातही तात्पुरते बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी पर्यायी स्थानकाची माहिती घ्यावी आणि बससेवेतील बदलांना सहकार्य करावे, असे पीएमपीएमएलने म्हटले आहे.
PMP चा उधळपट्टीविरोधात ‘सर्जिकल स्ट्राइक’! अनावश्यक खरेदीवर बंदी अन् २४ तासांत…
प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती- २५ सप्टेंबरला बसस्थानकांमध्ये बदल
लक्ष्मी नारायण चौक – कात्रज, कोंढवा, अप्पर, मार्केट यार्डकडे जाणाऱ्या बस.
पर्वती पायथा (स्वामी समर्थ मठ) – सिंहगड रस्त्याकडे जाणाऱ्या बस.
वेगा सेंटर – हडपसर, भवानी पेठ, नाना पेठ, रास्ता पेठकडे जाणाऱ्या बस.
एस.एन.डी.टी. कॉलेजजवळ – कोथरूड डेपो, माळवाडी, एनडीए गेटकडे जाणाऱ्या बस.
प्रवाशांनी मूळ स्थानकाऐवजी वरील पर्यायी स्थानकांवरून बस पकडावी. विसर्जन मिरवणुकीनुसार बसमार्गातही तात्पुरते बदल होऊ शकतात.






