युद्ध अटळ आहे! शांती कितीही जोपासली तरी शांतेतच भंग करणारे असतातच आणि जेव्हा कुणी शांतात भंग करतो तेव्हा त्याला अद्दल शिकवणेही धर्म आहे. जसे की हिरण्याक्षाच्या वधासाठी स्वतः श्री भगवान विष्णूंनी वराह अवतार घेतला. हिरण्यकश्यपूच्या वधासाठी नरसिंह अवतार घेतला. हे झालं स्वर्णयुगातल्या गोष्टी, पण द्वापरयुगातही असे काही लढाया झाल्या.
हे आहेत देशातील प्रसिद्ध रणांगणे. (फोटो सौजन्य - Social Media)
त्यातील सगळ्यात महत्वाची लढाई म्हणजे 'महाभारत'! कौरव आणि पांडव या दोघांच्या दरम्यान झालेली ही लढाई हरियाणा येथे स्थित असलेल्या 'कुरुक्षेत्र' भागात झाली.
देशातील दुसरे प्रसिद्ध आणि मराठ्यांच्या वीरतेची गाथा सांगणारी लढाई म्हणजे 'मराठा Vs अब्दाली.' मुळात, ही लढाई पानिपतच्या मातीवर झाली होती. याआधी येथे दोन महाभयंकर लढायादेखील झाल्या होत्या.
देशात इंग्रजननी पाऊल १७५७ मध्ये Nawab Siraj-ud-Daulah शी युद्ध करून ठेवले. हे युद्ध पश्चिम बंगालमध्ये स्थित असून या रणभूमीला Plassey म्हणून ओळखले जाते.
विजयनगर आणि दख्खन सल्तनतमध्ये झालेले युद्ध अविस्मरणीय आहे. कर्नाटकाच्या तालिकोटा येथे हे युद्ध घडले होते.
महाराणा प्रताप यांचे शौर्यगाथा सांगणारे युद्ध 'हल्दीघाटी' या रणभूमीवर झाली. या रणांगणावर रजपूत आणि मुघल यांच्या खमासान पाहिले गेले.