(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अंकिता लोखंडे आणि विक्की जैन हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध कपल आहे. या दोघांबाबत नेहमीच अशा चर्चा रंगत असतात की, ते लवकरच पालक होणार आहेत. मात्र, आतापर्यंत या चर्चा फक्त अफवा ठरल्या. ती व तिचा नवरा विकी जैन अनेकदा सोशल मीडियामार्फत एकमेकांबरोबरचे, तसेच कुटुंबीयांबरोबरचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करीत असतात. नुकतेच तिने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक खास पोस्ट शेअर केली असून, ज्यात निर्माता संदीप सिंग आणि पती विकी जैन यांच्यासोबतचे काही फोटो आहेत.या पोस्टमध्ये अंकिताने संदीप सिंगला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या. मात्र यामध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं ते “आमच्या होणाऱ्या बाळासाठी…” या वाक्याने. यामुळे पुन्हा एकदा तिच्या गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
अंकिताने शेअर केलेल्या पोस्टमधून तीने सांगितले की संदीप तिला कसा भेटला, तसेच संदीपने अंकिता, तिचा पती आणि अगदी त्यांचे होणारे बाळ यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली, जी तिला खूप भावली. तिने लिहिले, “संदीप तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! देव तुला नेहमीच आशीर्वाद देवो. मी फोन करण्याचा प्रयत्न केला; पण नेहमीप्रमाणे तुझा फोन लागला नाही. तरीही, मी तुला सांगू इच्छिते की, तू नेहमीच माझ्याबरोबर आहेस याबद्दल मी आभारी आहे. तू अदभुत आहेस आणि काल तू ज्या पद्धतीने आलास, खूप काळजी दाखवलीस आणि माझ्यासाठी, विकीसाठी आणि आमच्या होणाऱ्या बाळासाठी तू खूप काही केलेस, ते मला खरोखरच भावले.”
“त्याला मारलं… आणि नंतर घरातही आणलं!”, बॉबी देओलने सांगितला धर्मेंद्र यांचा न ऐकलेला किस्सा
अकिंता पुढे म्हणते, त्यांचे नाते आणखी मजबूत होत जाईल आणि ते तिघेही एकत्र राहतील. तिने त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे कौतुक केले आणि त्याला शुभेच्छा दिल्या. तिने लिहिले, “मला खरोखर तुझी काळजी आहे आणि तू आमच्या आयुष्यात आहेस याबद्दल मी आभारी आहे. मला आनंद आहे की, विकी तुझी कदर करतो. तसेच तो तुला समजून घेतो. माझा मित्र माझ्या पतीच्याही इतक्या जवळ आहे याचा मला खूप आनंद आहे. मला खरोखरच असे वाटते की, हे नाते काळानुसार अधिक मजबूत व्हावे आणि आपण तिघेही एकत्र उभे राहू शकू.”
मराठवाड्यातील पूरपरिस्थिती पाहून संकर्षण कऱ्हाडेने केलं मदतीचं आवाहन, म्हणाला, ”हे फार क्लेशदायक..”
या पोस्टमुळे हे कपल पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे, या पोस्टखाली सोशल मीडियावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “तुम्ही गर्भवती आहात का?” दुसऱ्याने कमेंट केली, “तुम्ही दोघे लवकरच आई-बाबा होणार आहात का? अश्या अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.