बारामतीमधून एक मोठी बातमी समोर येत अली आहे. लँडिंग दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला आहे. अजित पवार यांचे या अपघातात निधन झाले आहे. हा अपघात अतिशय भयकंर होता. या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यापूर्वी देखील अनेक महत्त्वाच्या भारतीय नेत्यांनी विमान अपघातात आपला जीव गमवला आहे. (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Ajit Pawar

बलवंतराय मेहता गुजरातचे माजी मुख्यमंत्री होते. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धावेळी सीमेजवळ पाकिस्ताननच्या हवाई दालाने त्यांचे विमान पाडले होते. यामध्ये बलवंतराव यांचे निधन झाले

माधवराव सिंधीया : कॉंग्रेसचे नेते माधवराव सिंधीया यांचा २००१ मध्ये उत्तर प्रदेशात चार्टर्ड विमानात निधन झाले होते

१९७३ मध्ये तत्कालीन केंद्रीय पोलाद आणि खाण मंत्री मोहन कुमारमंगलम यांचा दिल्लीजवळ विमान अपघातात मृत्यू जाला होता. एअर इंडियाचे एआय ४४० विमानाचा हा अपघात होता

वाएस राजशेख रेड्डी आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री यांचाही २००९ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. ते राज्याचे १४ वे मुख्यमंत्री होते. त्यांचे विमान २४ तासाच्या शोधानंतर नल्लमला जंगलात आढळले होते.

संजय गांधी : तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे धाकटे सुपूत्र संजय गांधी यांचा १९८० मध्ये विमान अपघात मृत्यू झाला होता. त्यांच्या निधानाने कॉंग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण जाली होती. इंदिरा गांधी यांना मोटठा धक्का बसला होता

जीएमसी बालयोग : तसेच लोकसभा अध्यक्ष आणि तेलुगू देसम पक्षाचे नेते जीएमसी बालयोग यांचाही अपघात जाला होचा. ३ मार्च २००२ रोजी ते आंध्र प्रदेशाला निघाले होते. यावेळी कैकलूरजवळी एक तलावात विमान कोसळले होते

दोराजी खांडू : याशिवाय अरुणाचल प्रदेशचे दोराजी खांडू यांचा ३० एप्रिल २०११ रोजी हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये अपघात झाला होता. यावेळी त्यांचे हेलिकॉप्टतर तवांगहून इटानगरला निगाल होते. यावेळी हेलिकॉप्टर राज्याच्या पश्चिम कामेंग जिल्ह्यात कोसळले होते

यापूर्वी १२ जून २०२५ रोजी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन लंडनसाठी निघाले असताना हा हा अपघात झाला होता






