G7 Summit : G7 हा जगातील सात देशांचा समूह ग्रुप आहे. यामध्ये आधुनिक अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जपान, इटली, जर्मनी आणि कॅनडाचा सामावेश आहे. १९७५ मध्ये याची सुरुवात झाली होती.
G7 Summit

मंगळवारी (१६ जून) फ्रान्सच्या इव्हियन येथे जागतिक नेत्यांचा ५२ व्या G7 महामेळाव्याला सुरुवात झाली आहे. या परिषदेसाठी भारतालाही आमंत्रित करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित दर्शवली आहे.

यावेळी इव्हियन-लेस-बेन्स येथे परिषदेतील जागतिक नेत्यांचे पारंपारिक सामूहिक फोटोसेशन झाले.

पंतप्रधान मोदींसोबत G7 परिषदेचे सदस्य देश अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, इटली, जपान, कॅनडा आणि जर्मनीचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष असे जागतिक नेते उपस्थित होते.

फ्रान्सचे अध्यक्ष इम्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना परिषदेचे अधिकृत आमंत्रण दिले आहे. यावेळी पंतप्रधानांचे मॅक्रॉन यांनी गळाभेट घेत खास स्वागत केले.

याशिवाय युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा, इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह-अल सिसी व जर्मनीचे चान्सरल फ्रेडिरतक मुर्झ यांनी देखील उपस्थित होते.

फोटोसेशन सुरु होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान मेलोनी यांच्यात हलका-फुलका संवाद झाला. सध्या या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ही मैत्रीपूर्ण मेलोडी जोडी पुन्हा चर्चेत आली आहे.

भारत या परिषदेचा सदस्य देश नाही. पण जगातील प्रमुख अर्थव्यवस्था आणि त्याच्या जागतिक भूमिकेमुळे अनेकदा परिषदेचे आमंत्रण दिले जाते. खास करुन देशांच्या पंतप्रधानांना मिळते.






