शरीरासाठी वरदान ठरेल पेरू! जाणून घ्या पेरू खाण्याची योग्य पद्धत आणि शरीराला होणारे भरमसाट फायदे
पेरू खाण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पचनक्रिया सुधारते. आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण आणि जुनाट बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पेरूचे सेवन करावे.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी पेरूच्या पानांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे पोटात वाढलेली जळजळ कमी होण्यासोबतच शरीरात थंडावा टिकून राहतो.
वजन वाढल्यानंतर अनेक लोक आहारात वेगवेगळ्या सप्लिमेंट्स किंवा गोळ्या औषधांचा समावेश करतात. पण त्याऐवजी पेरूचे सेवन करावे. यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा थर कमी होतो आणि झपाट्याने चरबी वितळून जाते.
वारंवार सर्दी खोकला किंवा कफाचा त्रास होत असलेल्या व्यक्तींनी पेरू खाऊ नये. यामध्ये असलेले थंड गुणधर्म सर्दीचा जोर वाढवतात, ज्यामुळे आरोग्य आणखीनच बिघडून जाते.
शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी पेरूपासून बनवलेले सॅलड किंवा इतर पदार्थ खावेत. यामध्ये अँटी ऑक्सिडंट्स आणि विटामिन सी मोठ्या प्रमाणावर आढळून येते.