पारंपारिक खणाच्या साड्या हल्ली सर्वच महिलांना नेसायला खूप आवडतात. पूर्वीच्या काळातील फॅशन पुन्हा नव्याने ट्रेंडमध्ये येत आहे. सणावाराच्या दिवसांमध्ये किंवा इतर वेळी महिलांसह मुलीसुद्धा आवडीने खणाच्या साड्या नेसतात. खणाची साडी विकत घेतल्यानंतर त्यावर नेमका कशाप्रकारे ब्लाऊज शिवून घ्यावा? हे बऱ्याचदा महिलांना सुचत नाही. ब्लाऊजच्या मागील गळाल्या नेमकी डिझाईन करावी, हे समजत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला खणाच्या साडीवरील ब्लाऊजवर मागील गळ्याला कोणत्या डिझाइन्सचे हॅन्ड पेंटिंग करावे, याबद्दल सांगणार आहोत. या डिझाइन्सचे नक्की ट्राय करून पहा. (pinterest)
पारंपरिक खणाच्या ब्लाऊजला द्या मॉर्डन टच!
ब्लाऊज वर तुम्ही शिवमुद्रा सुद्धा लिहून घेऊ शकता. कोणत्याही ऐतिहासिक कार्यक्रमात गेल्यानंतर हा ब्लॉउज तुमच्या लुकची आणखीनच शोभा वाढवेल.
सर्वच महिला आणि मुलींना कानातले घालायला खूप आवडतात. मात्र तुम्ही अधिक स्टयलिश आणि सुंदर दिसण्यासाठी ब्लॉउजच्या मागील गळ्यावर सुंदर कानातल्यांचे हॅन्ड पेंटिंग काढू शकता.
खणाच्या साडीवरील ब्लाऊजवर तुम्ही नथीचे पेंटिंग करू शकता. पारंपरिक दागिना म्हणून नथीची सगळीकडे ओळख आहे. याशिवाय ब्लॉउजवर नथ अतिशय सुंदर दिसेल.
कोणत्या रंगाच्या खण साडीवरील ब्लाऊजवर किंवा कॉटनच्या ब्लाऊजवर तुम्ही मिरीचे सुंदर पेंटिंग काढू शकता. यामुळे तुम्हाला ब्लाऊजवर इतर कोणतीही डिझाइन्स काढण्याची आवश्यकता नाही.
हल्ली ब्लाऊजवर गणपती किंवा गणपतीच्या वेगवेगळ्या रूपांचे हॅन्ड पेंटिंग काढले जाते. खणाच्या साडीवर हॅन्ड पेंटेड गणपती सुंदर दिसेल.