Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sachin Tendulkar Birthday : सचिन तेंडुलकरचे ‘हे’ ५ विक्रम, ज्यांना मोडीत काढणे आहे अशक्य..

भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज त्याचा ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. सचिनला क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाते. सचिन हा जगातील महान फलंदाजांपैकी एक आहे. सचिनने त्याच्या कारकिर्दीत भल्याभल्या गोलंदाजांना पाणी पाजायला भाग पाडले आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. सचिनने २०१३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा सामना खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र, अजून देखील त्याने रचलेले असे काही विक्रम आहेत, जे अद्याप मोडले गेलेले नाहीत. वस्तिक पाहता त्यांना मोडणे जवळपास अशक्य मानले जाते.(फोटो-सोशल मीडिया)

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 24, 2025 | 02:51 PM

Sachin Tendulkar Birthday: 'These' 5 records of Sachin Tendulkar, which are impossible to break..

Follow Us
Close
Follow Us:
1 / 6

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो पहिल्या नंबरवर आहे. सचिनने सर्वाधिक ६६४ सामने खेळले आहेत, ज्यात २०० कसोटी, ४६३ एकदिवसीय आणि एकमेव टी-२० सामन्याचा समावेश आहे. 

2 / 6

 सचिन तेंडुलकरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये एकूण २६४ वेळा ५० हून अधिक धावांचा पल्ला गाठला आहे. याशिवाय, त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४५ आणि कसोटी क्रिकेटमध्ये १९९ वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत. 

3 / 6

सचिन तेंडुलकरने १९८९ मध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळला. तेव्हापासून २०११ पर्यंत तो भारतासाठी अविरत  क्रिकेट् खेळत राहिला.  सचिनने एकूण २२ वर्षे ९१ भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यानंतर हा विक्रम बांगलादेशचा यष्टीरक्षक आणि फलंदाज मुशफिकुर रहीमच्या नावावर आहे, ज्याने १८ वर्षे आणि ९२ दिवस एकदिवसीय क्रिकेट खेळले आहे.

4 / 6

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक ठोकणारा सचिन तेंडुलकर हा एकमेव खेळाडू  ठरला आहे. सचिनने कसोटीत ५१ आणि एकदिवसीय सामन्यात ४९ शतक झळकावली आहेत. हा विक्रम मोडणे जवळपास अशक्य असले तरी विराट कोहली या विक्रमच्या जवळ आहे. 

5 / 6

सचिन तेंडुलकरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये ३४ हजार ३५७ धावा केल्या आहेत. क्रिकेट इतिहासात सर्वाधिक धावा करणारा सचिन हा पहिला खेळाडू आहे. ६६४ सामने खेळताना सचिनने ३४ हजार ३५७ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये १०० शतके आणि १६४ अर्धशतकांचा समावेश आहे. 

6 / 6

सचिन तेंडुलकरला भारताचा सर्वोत्तम नागरी पुरस्कार देण्यात आला आहे. २०१४ मध्ये सचिन तेंडुलकरला भारतरत्न देण्यात आला होता. हा सन्मान मिळवणारा तो पहिलाच खेळाडू ठरला होता. यापूर्वी त्यांना १९९४ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

Web Title: Happy birthday sachin tendulkar 5 unbroken records of sachin tendulkar which are impossible to break

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 02:48 PM

Topics:  

  • bcci
  • IPL 2025
  • Sachin Tendulkar

संबंधित बातम्या

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
1

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

BCCI हटवू शकते Mohsin Naqvi यांना पदावरुन, या नियमामुळे पीसीबी अध्यक्षांचा माज उतरणार?
2

BCCI हटवू शकते Mohsin Naqvi यांना पदावरुन, या नियमामुळे पीसीबी अध्यक्षांचा माज उतरणार?

मोहसीन नक्वी यांचा माफीनामा! भयभीत होत BCCI ची मागितली आगाऊ माफी; वाचा सविस्तर 
3

मोहसीन नक्वी यांचा माफीनामा! भयभीत होत BCCI ची मागितली आगाऊ माफी; वाचा सविस्तर 

IND vs SL : हरमनप्रीतच्या संघावर सचिन तेंडुलकरने व्यक्त केला विश्वास! म्हणाला – भारतातील महिला क्रिकेट एका महत्त्वपूर्ण…
4

IND vs SL : हरमनप्रीतच्या संघावर सचिन तेंडुलकरने व्यक्त केला विश्वास! म्हणाला – भारतातील महिला क्रिकेट एका महत्त्वपूर्ण…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.