Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hardik Pandya: हार्दिकला धक्क्यांवर धक्के! कमबॅकला पुन्हा ब्रेक; आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतूनही बाहेर

Hardik Pandya Ruled Out From Syed Mushtaq Ali Trophy: दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर असलेल्या हार्दिक पांड्याला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तो आता देशांतर्गत टी-२० स्पर्धा, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मधूनही बाहेर पडला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 07, 2026 | 06:07 PM
Hardik Pandya

Hardik Pandya

Follow Us
Follow Us:
  • हार्दिकची मैदानावर एन्ट्री लांबणीवर
  • सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतूनही माघार
  • क्रुणालला मिळाली बडोद्याची कॅप्टन्सी
Hardik Pandya: टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या मैदानावरील पुनरागमनाची प्रतीक्षा अधिकच लांबत चालली आहे. अनेक दुखापतींमुळे भारतीय संघाबाहेर असलेला हार्दिक, गेल्या काही महिन्यांपासून बंगळुरु येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये (CoE) आपल्या फिटनेसवर काम करत आहे.

दुखापतीमुळे हार्दिक आयपीएल २०२६ पासून मैदानाबाहेर आहे. आता, तो देशांतर्गत टी-२० स्पर्धा, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (SMAT) मधूनही बाहेर पडला आहे. बडोद्याने १४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२६-२७ साठी आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. यामध्ये हार्दिकचा समावेश नाही. याशिवाय, क्रुणाल पांड्याकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे.

IND vs NZ : पावसाचा खेळ पण भारताचा विजयरथ सुसाट! दुसऱ्या वनडेत न्यूझीलंडला धोबीपछाड, मालिकेत 2-0 ने आघाडी

हार्दिकला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतूनही वगळले

ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धच्या घरच्या एकदिवसीय मालिकेसाठी हार्दिक पांड्याचा भारत ‘अ’ संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, पोटरीच्या नवीन दुखापतीमुळे त्याला संघातून माघार घ्यावी लागली. आयपीएल २०२६ पासून हार्दिक आपला बहुतेक वेळ बंगळुरु येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये घालवत आहे. आयपीएलदरम्यान, त्याला प्रथम पाठीची दुखापत झाली. त्यानंतर हॅमस्ट्रिंगच्या ताणामुळे तो मैदानापासून दूर राहिला. हार्दिकने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना न्यूझीलंडविरुद्ध टी-२० विश्वचषक अंतिम सामन्यात खेळला होता.

संघ व्यवस्थापनाची नजर हार्दिकच्या फिटनेसवर

भारतीय संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे. यानंतर, ते डिसेंबरमध्ये मायदेशात श्रीलंकेविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळतील. पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणारा एकदिवसीय विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून, संघ व्यवस्थापनाला हार्दिक पांड्याचे लवकरात लवकर कमबॅक हवे आहे. परंतु, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी हे स्पष्ट केले आहे की, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह हे संघासाठी महत्त्वाचे खेळाडू आहेत, परंतु ते पूर्णपणे तंदुरुस्त असल्याशिवाय विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत त्यांना खेळवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. संघ व्यवस्थापनाला दोन्ही खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबत कोणताही धोका पत्करायचा नाही.

बडोदा चंदीगडविरुद्ध मोहिमेला करणार सुरुवात

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी जाहीर झालेल्या बडोदा संघात कृणाल पांड्यासोबत जितेश शर्मा, दीपक हुडा आणि रसिक सलाम यांसारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. बडोदा आपल्या मोहिमेची सुरुवात १४ नोव्हेंबर रोजी मुंबईत चंदीगडविरुद्ध करेल.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२६ साठी बडोदा संघ

क्रुणाल पांड्या (कर्णधार), अतित शेठ (उपकर्णधार), दीपक हुडा, शिवालिक शर्मा, शाश्वत रावत, अमित पासी (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), भानू पानिया, महेश पिठिया, परीक्षित पाटीदार, हेमंत पुंडे, राज लिंबानी, रसिक डार, रसिख सलाम, ध्रुव बी.

IND vs PAK: दिवाळीच्या दिवशी पाकिस्तानची धुलाई करण्यासाठी टीम इंडिया सज्ज! कधी अन् केव्हा रंगणार महामुकाबला?

Web Title: Hardik pandya ruled out syed mushtaq ali trophy 2026 krunal pandya baroda captain pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 06:07 PM

Topics:  

  • bcci
  • Hardik Pandya
  • krunal pandya
  • Syed Mushtaq Ali Trophy

संबंधित बातम्या

Mumbai Indians : …मग हार्दिक पंड्याने कर्णधारपद सोडावे, अंबाती रायडूचा महत्त्वाचा सल्ला
1

Mumbai Indians : …मग हार्दिक पंड्याने कर्णधारपद सोडावे, अंबाती रायडूचा महत्त्वाचा सल्ला

WPL 2027 चं वेळापत्रक जाहीर! ट्रॉफीसाठी भिडणार पाच संघ; कधी, कुठे अन् केव्हा रंगणार थरार?  पाहा संपूर्ण शेड्यूल
2

WPL 2027 चं वेळापत्रक जाहीर! ट्रॉफीसाठी भिडणार पाच संघ; कधी, कुठे अन् केव्हा रंगणार थरार? पाहा संपूर्ण शेड्यूल

Rishabh Pant न्यूझीलंडच्या विमानात बसणार की नाही? फिटनेस टेस्टमध्ये अपयशी अन्…; 48 तासांमध्ये होणार निर्णय
3

Rishabh Pant न्यूझीलंडच्या विमानात बसणार की नाही? फिटनेस टेस्टमध्ये अपयशी अन्…; 48 तासांमध्ये होणार निर्णय

Shubman Gill on Hardik Pandya: ‘हार्दिक पांड्याला आधी स्थानिक क्रिकेट खेळावं लागेल…’ शुभमन गिलचे फर्मान
4

Shubman Gill on Hardik Pandya: ‘हार्दिक पांड्याला आधी स्थानिक क्रिकेट खेळावं लागेल…’ शुभमन गिलचे फर्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.