रोज सकाळी उठल्यानंतर आपल्या काहींना काही खाण्याची सवय असते. अशावेळी तुम्ही अक्रोडचे सेवन करू शकता. निरोगी जीवनशैली जगण्यासाठी सकाळी उठल्यानंतर भिजवलेले अक्रोड खावे. यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणात आढळून येतात. हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी अक्रोड गुणकारी आहेत. आज आम्ही तुम्हाला रिकाम्या पोटी भिजवलेल्या अक्रोडचे सेवन केल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात, हे जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
अक्रोड खाण्याचे फायदे
वय वाढल्यानंतर हाडे दुखण्यास सुरुवात होते. हाडांचे दुखणे वाढल्यानंतर अनेकदा वेदना सहन होत नाहीत. अशावेळी तुम्ही सकाळी उठल्यानंतर भिजवलेल्या अक्रोडांचे सेवन करू शकता.
बरेच जण वाढलेले वजन कमी करण्यासाठी जीम किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध घेतात, पण असे न करता नियमित भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
अनेकदा आपली त्वचा कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. त्वचेसंबंधित समस्या उद्भवल्यानंतर तुम्ही सकाळी उठल्यावर भिजवलेले अक्रोड खाल्यास आरोग्याला फायदे होतात.
अक्रोडमध्ये विटामिन ई, ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे मेंदूचे आरोग्य निरोगी राहते. तसेच यामुळे मेंदूतील रक्ताभिसरण वाढते. यामुळे प्रोस्टेट कॅन्सर, कोलोरेक्टल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर इत्यादी आजारांचा धोका टाळतो.
अक्रोडचा वापर गोड पदार्थ, स्मूदी, मिल्कशेक इत्यादी अनेक पदार्थ बनवण्यासाठी केला जातो.