जगभरात प्रत्येक देशात वेगवेगळ्या वेळी सूर्योदय आणि सूर्यास्त होतो. जगाच्या नकाशावर पूर्वेकडे असणाऱ्या देशांमध्ये सूर्योदय होतो तर पश्चिमेकडील देशांमध्ये उशिरा सूर्य उगवतो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी सूर्य उगवण्याची आणि मावळण्याची वेळ वेगळी असते. दिवसाची सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जाण्यासाठी अनेक लोक भल्या पहाटे सूर्याचे दर्शन घेतात. आज आम्ही तुम्हाला संपूर्ण देश गाढ झोपेत असताना कोणत्या ठिकाणी सगळ्यात आधी सूर्योदय होतो, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – istock)
संपूर्ण जग गाढ झोपेत असताना होतो या ठिकाणी होतो सूर्योदय, पहा नकाशावरील देशांची नावे आणि सविस्तर माहिती

प्रशांत महासागरातील किरिबाती देशाचा 'लाईन आयलंड्स' वर जगातील सगळ्यात पहिला सूर्योदय होतो. तिथे असलेले मिलेनियम आयलंड दिवसाची सुंदर सुरुवात करते.

किरिबातीमध्ये जगातील सर्वात प्रगत वेळ क्षेत्र आहे. (UTC+14), (GMT) या वेळेनुसार तिकडे पहाटे 2 वाजताच सूर्योदय होतो. जसे की लंडनमध्ये (GMT) दुपारचे 12 वाजतात तेव्हा तिकडे सकाळचे 2 वाजलेले असतात.

1995 पूर्वी किरिबाती देश दोन वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेला होता. त्यानंतर देशाने आंतरराष्ट्रीय वार रेषेचे स्थान दोन्ही देश एकत्र आणले.

न्युझीलंडच्या पूर्वेला असलेल्या चॅथम आयलंड्स आणि गिसबोर्न शहरात सगळ्यात पहिला सूर्योदय होतो असे मानले जाते. त्यामुळे दर दिवशी सगळ्यात पहिला सूर्यप्रकाश तिकडेच पडतो.

जपानला कायमच उगवत्या सूर्याचा देश म्हणून संबोधले जाते. यामध्ये भौगोलिक आणि वैज्ञानिक कारणे सुद्धा आहेत. किरिबाती आणि न्युझीलंड या देशांमध्ये जपानच्या आधी सूर्य उगवतो.






