मागील अनेक वर्षांपासून गुलाबाच्या फुलांचा वापर आयुर्वेदामध्ये केला जात आहे. यामध्ये हर्बल औषधी गुणधर्म आहेत,ज्यामुळे सौंदर्य उपचार, त्वचेची काळजी इत्यादी अनेक गोष्टींसाठी वापर केला जात आहे. गुलाबाचे फूल सगळ्यांचं आवडते.गुलाबाचा सुगंध अनेकांना भुरळ पडतो. गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर सजावटीसाठी, गोड पदार्थ बनवण्यासाठी इत्यादी अनेक कारणांसाठी वापरला जातो. या फुलांच्या वासामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्यांचे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. (फोटो सौजन्य- istock)
गुलाबाच्या पाकळ्यांचे फायदे

त्वचेच्या आरोग्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या नैसर्गिक क्लींजर म्हणून काम करतात. कच्च्या दुधात गुलाबाच्या पाकळ्या मिक्स करून लावल्याने त्वचेचा रंग आणि त्वचेवरील डाग निघून जाण्यास मदत होते.

गुलाबाच्या पाकळ्या चवीला तुरट असतात. पण त्याच्यामुळे केसांनादेखील फायदे होतात. यामुळे टाळूवरील कोंडा, घाण स्वच्छ होऊन केस स्वच्छ होतात. केस हायड्रेट राहण्यास मदत होते.

अन्नपदार्थाची चव वाढवण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर केला जातो. यामुळे जेवणाची चव वाढून जेवण प्रेझेंटेबल दिसते.

शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर केला जातो. चिंता , नैराश्य, निद्रानाश, चक्कर येणे, पोटदुखी, मासिक पाळी येणे, पीएमएस, त्वचेवर पुरळ उठणे किंवा लालसरपणा इत्यादी अनेक समस्या दूर होतात.

गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर मेकअप प्रॉडकट बनवण्यासाठी सुद्धा केला जातो. पाकळ्यांपासून टोनर, मेकअप पावडर, अनेक क्रीम्स, लिपस्टिक इत्यादी अनेक वस्तू बनवल्या जातात.






