अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना शंका उपस्थित केली (फोटो - सोशल मीडिया)
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. त्याचरोबर अजित पवारांच्या निधनांवर देखील संशय व्यक्त केला आहे. वडेट्टीवार म्हणाले की. “या प्रकरणात घातपाताचा संशय उपस्थित झाला आहे. अपघात झाला की काही वेगळा प्रकार घडला, याबाबत महाराष्ट्रात आणि देशात चर्चा झाली. हा केवळ अपघात वाटत नाही, अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. काही बाबी संशयास्पद असल्याचे दिसून येते. “ब्लॅक बॉक्स जळाल्याचा अर्थ ‘डाल में कुछ काला है’ असेच म्हणावे लागेल,” अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
हे देखील वाचा : ‘हर्षवर्धन सपकाळ यांना तात्काळ अटक करा!” टिपू सुलतानशी तुलनेवरून हेमंत पाटील आक्रमक
याचबरोबर पार्थ पवार यांना पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामधून क्लीन चीट देण्यात आली आहे. यावरुन देखील वडेट्टीवार यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, “पुणे जमीन गैरव्यवहाराचा हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्यात येणार आहे. त्यावेळी या प्रकरणावरून सरकारला जाब विचारला जाईल की क्लीन चिट कशी देण्यात आली? एवढ्या मोठ्या व्यवहारात सामान्य व्यक्ती व्यवहार करू शकत नाही. मोठ्या लोकांच्या आशीर्वादाशिवाय असा प्रकार घडू शकत नाही. जो भाजपसोबत आहे तो स्वच्छ आहे, त्यांनी कितीही मोठा घोटाळा केला तरी त्याला शिक्षा होत नाही, अशी अनेक घटनांवरून भावना निर्माण झाली आहे,” अशी घणाघाती टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
हे देखील वाचा : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले
पुढे विजय वडेट्टीवार म्हणाले की, “मंत्रालयातील काही निर्णय संशयास्पद वाटतात. अजित पवारांचे निधन झालेले असताना अशा गंभीर परिस्थितीत शाळा प्रमाणपत्रासाठी परवानगी कशी देण्यात आली? संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई झाली पाहिजे. अशा प्रकारे परवानगी देणे गंभीर बाब आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे. मंत्रालय राज्यातील भ्रष्टाचाराचे अड्डे बनले आहे, अशी भावना निर्माण झाली आहे. मनमानी पद्धतीने कारभार सुरू असल्याचा आरोप,” काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.






