जेवणातील प्रत्येक पदार्थामध्ये टोमॅटोचा वापर केला जातो. डाळ, भाजी, आमटी, चटणी बनवण्यासाठी टोमॅटोचा वापर केला जातो. चवीला आंबट गोड असलेले टोमॅटो आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहेत. टोमॅटोमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे रोजच्या आहारात टोमॅटोचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला टोमॅटोचे सेवन केल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
टोमॅटो खाण्याचे आरोग्यदायी फायदे

टोमॅटोचे सीव्हीन केल्याने कॅन्सरपासून शरीराचे होणारे नुकसान टाळता येते. टोमॅटोमध्ये असलेले ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करून शरीराला आलेली सूज कमी करण्यासाठी मदत करतात.

हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी टोमॅटोचे सेवन करावे. तसेच यामुळे रक्तदाब आणि लाइकोपीन कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.

वाढलेले वजन कमी करण्यासाठी टोमॅटो गुणकारी आहेत. टोमॅटो खाल्ल्याने पोट लगेच भरून लवकर भूक लागत नाही.

टोमॅटोमध्ये भरपूर पाणी असते. ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

त्वचेसाठी टोमॅटो फायदेशीर आहेत. टोमॅटोपासून बनवलेला फेस पॅक किंवा फेस मास्क चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाऊन त्वचा उजळण्यास मदत होते.






