शिवम दुबे(फोटो-सोहल मीडिया)
IND vs NZ 4th T20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येत आहे.या मालिकेतील चौथा सामना आज विशाखापट्टणम येथील ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. टॉस गमावणाऱ्या न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर २१६ धावांचे लक्ष्य दिले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघ अडचणीत आला असताना शिवम दुबेने चेंडूत शानदार अर्धशतक झळकवले आहे.
या समान्यापूर्वी भारताने नानेफक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि न्यूझीलंड संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले . न्यूझीलंडकडून टिम सेफर्टच्या ३६ चेंडूत ६२ धावा आणि डेव्हॉन कॉनवेच्या २३ चेंडूत ४४ धावा, तसेच डॅरिल मिशेलच्या महत्वपूर्ण १८ चेंडूत नाबाद ३८ धावांच्या जोरावर ७ गडी गांवून २१५ धावा करून भारतासमोर २१६ धावांचे लक्ष्य ठेवले.
धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. अभिषेक शर्मा भोपळा न फोडता बाद झाला. त्यानंतर कर्णधार सूर्यकूमार यादव देखील झटपट बाद झाला. तो ८ धावा करून बाद झाला. त्यानंतर सलामीवीर संजू संजू सॅमसन आणि रिंकू सिंग,यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, संजू सॅमसन २४ धावा त्यानंतर हार्दिक पांड्या २ धावा करून बाद झाला. शिवम दुबे आणि रिंकू सिंग यांनी डाव सांभाळला परंतु, रिंकू ३९ धावा करून बाद झाला. त्यानंतर दुबेने आक्रमक खेळी केली आणि भारताच्या आशा जीवंत ठेवल्या. त्याने १५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले त्यानंतर तो २३ चेंडूत ३ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ६५ धावा करून बाद झाला. त्यानंतर हर्षित राणा ९ आणि अर्शदीप सिंग ० धावा करून बाद झाला. तसेच जसप्रीत बूमराह ४ धावा करून बाद झाला. १७.५ षटकात भारताच्या ९ बाद १६२ धावा झाल्या होत्या.
हेही वाचा : IND vs NZ 4th T20I : विशाखापट्टणममध्ये किवीचे भारतासमोर 216 धावांचे लक्ष्य! सेफर्ट-कॉनवे चमकले
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : टिम सेफर्ट (डब्ल्यू), डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल सॅन्टनर (क), झकरी फॉल्केस, मॅट हेन्री, ईश सोधी, जेकब डफी
भारत प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (डब्ल्यू), सूर्यकुमार यादव (क), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, हर्षित राणा, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह






