लातूरच्या राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येतेय.लातूर महानगरपालिकेत हातात हात घालून सत्ता मिळवणारे काँग्रेस आणि वंचित आता आमनेसामने आले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत जागावाटपाचा तिढा सुटला नसल्याने अखेर ही युती फुटली असून, वंचित बहुजन आघाडीने स्वबळाचा नारा दिलाय. महापालिकेत एकहाती सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस-वंचित एकत्र आले, पण जिल्हा परिषदेत मात्र दोघांचं बिनसलंय. वंचितचा आरोप आहे की, काँग्रेसनं युतीसाठी अशा जागा देऊ केल्या जिथे उमेदवारच नव्हते. हा सन्मानजनक प्रस्ताव नसल्याचा ठपका ठेवत वंचितने युती तोडण्याचा निर्णय घेतलाय . आता वंचितने लातूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या 37 जागा स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे.एकिकडे जिल्हा परिषदेत काडीमोड झाला असला, तरी महापालिकेत महापौर पदासाठी वंचितने काँग्रेससमोर नवा प्रस्ताव मांडला आहे. आता काँग्रेस वंचितची ही अट मान्य करणार की लातूरच्या सत्तेचे समीकरण पुन्हा बदलणार. याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. .