धक्कादायक! जगातील सर्वात श्रीमंत देश भिकेला लागला? स्वतःच्याच नागरिकांसमोर पसरला हात (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था ही तेलातून मिळाणाऱ्या उत्पन्नांवर अवलंबून आहे. परंतु गेल्या काही काळात तेला किमतींमध्ये घसरण झाल्याने सौदीच्या अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम होत आहे. सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्था संतुलनासाठी तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलर असणे गरजेचे आहे, परंतु सध्या जागतिक बाजारपेठांमध्ये हा दर ६० डॉलरच्या आसपास आहे. यामुळे याचा थेट परिणाम हा सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे.
मिडल ईस्ट आयच्या अहवालानुसार, सौदीच्या अर्थव्यवस्थेतील असंतुलनामुळे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या व्हिजन २०३० मिशनवर परिणाम होत आहे. या व्हिजन २०३० अंतर्गत सौदी अरेबिया केवळ तेलावर अवलंबून न राहता देशात विविध प्रकल्प आणि गुतंवणूक वाढवत आहे. यामध्ये १७० किलोमीटर लांबीचे निओमी सिटी, वाळवंटातील स्की रिसॉर्ट, रियाधमधील भव्य मुकाब इमारत, अनेक एआय प्रकल्प, मेगाप्लॅन्स याचा सामावेश आहे. मात्र आर्थिक असंतुलनामुळे अनेक प्रकल्प मंदावले आहे. यामुळे सरकारने यामधील गुंतवणूक कमी केली आहे.
प्रकल्पांमधील गुंतवणूक लक्षणीयरित्या कमी झाली असल्याने सौदी सरकार चिंतेत आहे. या समस्येला सोडवण्यासाठी सौदी अरेबिया परदेशी गुंतवणूक दारांना सौदी अरेबियातमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन करत आहेत. तसेच देशातील गुंतवणूकदारांना देखील देशांतर्गंत गुतंवणूक वाढवण्याचे आवाहन केले जात आहे. याशिवाय सार्वजनिक निधींमधू, आंतरराष्ट्रीय कर्ज घेऊ आर्थिक ताण कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
मिडल ईस्ट आयच्या अहवालानुसार, सौदी अरेबिया पूर्णपणे दिवाळखोर झालेला नाही. सध्या तेलाच्या किंमतींमध्ये अनिश्चितता ही तात्पुरती आहे. यामुळे गुंतवणूकगारांचा विश्वास आहे सौदी अरेबिया दिवाळखोर झालेला नाही. परंतु सध्या त्याच्यावर आर्थिक भारत वाढत आहे. यामुळे सौदी सरकार श्रीमंत नागरिकांकडून मदत घेत आहे.
डिस्पोजिबल पॅकेजिंगवर आता ‘अल्लहा’ चे नाव लिहिण्यास बंदी; ‘या’ देशाने घेतला सर्वात मोठा निर्णय
Ans: मिडल ईस्ट आयच्या अहवालानुसार, सध्या तेलाच्या किमती सौदीच्या अपेक्षेपेक्षा कमी झाल्या आहेत. शिवाय सौदी तेल उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात अवलंबून होत आहे. यामुळे सौदीला आर्थिक तणावाचा सामना करावा लागत आहे.
Ans: १७० किलोमीटर लांबीचे निओमी सिटी, वाळवंटातील स्की रिसॉर्ट, रियाधमधील भव्य मुकाब इमारत, अनेक एआय प्रकल्प, मेगाप्लॅन्स या व्हिजन २०२३० च्या परिणाम पडत आहे.
Ans: सौदीच्या व्हिजन २०३० च्या महत्वकांक्षी प्रकल्पांमधील गुंतवणूक लक्षणीयरित्या कमी झाली असल्याने सौदी सरकार चिंतेत आहे. यामुळेच सौदी देशातील श्रीमंत नागरिकांकडे गुंतवणूकीचे आवाहन करत आहे.






