फ्रिजमध्ये ठेवलेलं चिकन, मासे किती वेळ व्यवस्थित टिकून राहतात? मटण किती काळ ताजे राहते?
चिकन किंवा मटण जास्त दिवस फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातील पोषण मूल्य कमी होऊन जातात. चिकनमध्ये खूप जास्त ओलावा असतो. ज्यामुळे फ्रिजमध्ये तापमान चिकन ठेवल्यास ते लवकर खराब होऊन जाते. याशिवाय चिकनला विचित्र वास येऊन हलका तपकिरी रंग दिसू लागतो.
चिकन खराब झाल्यानंतर त्यात चिकटपणा वाढतो आणि वास येण्यास सुरुवात होते. त्यामुळे २ दिवसांपेक्षा जास्त दिवस चिकन फ्रिजमध्ये ठेवू नये. चुकूनही खराब झालेले चिकन खाल्ल्यास आतड्यांचे गंभीर नुकसान होऊ शकते.
शिजवलेले मटण 3 ते 4 दिवसांपेक्षा जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवू नये. तसेच चिकन, मटण किंवा कोणतेही मांस बनवण्याआधी ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
शिजवलेले चिकन किंवा मटण जास्त दिवस फ्रिजमध्ये ठेवू नये. शिजलेले मटण लवकर खराब होण्याची शक्यता असते. तयार केलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे ऍसिडिटी आणि अपचनाची समस्या वाढते.
फ्रिजमध्ये स्टोर करून ठेवलेले मटण ४ ते ५ दिवस व्यवस्थित राहते. पण मटणातील चरबी आजूबाजूचा वास शोषून घेते. खराब झालेल्या मटणाला अतिशय वाईट वास येऊन चिकटपणा तयार होतो. याशिवाय मटणाचा रंग बदलण्यास सुरुवात होते.