रात्रीच्या वेळी अचानक जाग आल्यानंतर काहींना काही खाण्याची इच्छा होते. अशावेळी प्रामुख्याने वेफर्स, चिवडा किंवा बिस्कीट खाल्ली जातात. पण रात्री शरीराची पचनक्रिया मंदावते. अशावेळी बिस्कीट किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. जंक फूडच्या सेवनामुळे शरीराला हानी पोहचते. त्यामुळे हलकीशी भूक भागवण्यासाठी पिस्त्याचे सेवन करावे. पिस्ता किमतीने अतिशय महाग असतो. त्यामुळे लोक पिस्त्याचे जास्त सेवन केले जात नाही. पण पदार्थ शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया पिस्ता खाण्याचे फायदे. (फोटो सौजन्य – istock)
रात्री खाण्यासाठी हेल्दी स्नॅक्स शोधत असाल तर पिस्त्याचे करा आवर्जून सेवन, चवीसोबतच शरीराला होतील फायदे

सुका मेवा खाल्ल्यामुळे मेंदूचे आरोग्य सुधारते. यामध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड आणि अँटिऑक्सिडंट्स इत्यादी अनेक आवश्यक घटक आढळून येतात. पिस्ता खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते.

पिस्त्यामध्ये प्रथिने, फायबर, निरोगी चरबी, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडेंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात किंवा रात्री भूक लागल्यानंतर पिस्त्याचे सेवन करावे.

पिस्ता खाल्ल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते, पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी पिस्ता खावा.

सुमारे 28 ग्रॅम पिस्तामध्ये 6 ग्रॅम प्रथिने असतात. रात्रीच्या वेळी पिस्ता खाल्ल्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. झोपेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी पिस्ता खावा.

पिस्त्यामध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळून येते. वाढलेले वजन कमी करायचे असल्यास आहारात वेगवेगळ्या सुक्या मेव्याचे सेवन करावे.






