हिवाळ्यात ओठ कोरडे होऊन रक्त येत असेल तर 'या' पद्धतीने घ्या काळजी
थंडीच्या दिवसांमध्ये भरपूर पाणी प्यावे. पाण्याच्या सेवनामुळे शरीर हायड्रेट राहते. तसेच तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी संतुलित आणि पोषक आहार घ्यावा.
ओठांवर मुलायमपणा कायम टिकवून ठेवण्यासाठी खोबरेल तेल किंवा तुपाचा वापर करावा. तूप आणि खोबरेल तेलाच्या वापरामुळे ओठांवरील त्वचा मऊ राहते.
रात्री झोपण्याआधी ओठांवर मध लावून ठेवावे. त्यानंतर काहीवेळाने ओठ पाण्याने स्वच्छ धुवावेत. मध लावल्यामुळे ओठांवर वाढलेला काळेपणा कमी होण्यासोबतच ओठ अतिशय मुलायम होतील.
थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला पोषण देण्यासाठी पालेभाज्या आणि फळांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात निर्माण झालेली आयर्नची कमतरता भरून निघते.
ओठांवर लावलेली लिपस्टिक कायमच क्लीजिंग मिल्कने काढावी किंवा नारळाच्या तेलाचा वापर करावा. तसेच मलाईमध्ये लिंबू मिक्स करून लावल्यास ओठांवरील डेड स्किन कमी होईल.