वजन वाढल्यानंतर अनेक लोक रात्रीचे जेवण बंद करून टाकतात. पण जेवण बंद करण्याऐवजी खाण्यापिण्यामधील चुकीचे पदार्थांचे सेवन बंद करावे. साखर, मैदा, बाहेरील पदार्थ, दारू, अल्कोहोलिक पेय इत्यादी पदार्थांचे सेवन न करता स्मूदी किंवा फळांच्या रसाचे सेवन करावे. यामुळे योग्य पद्धतीने वजन कमी होण्यास मदत होईल. वजन कमी करण्यासाठी दारू आणि इतर अमली पदार्थांपासून दूर राहणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी कोणत्या नॉन-अल्कोहोलिक पेयांचा समावेश करावा, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
वजन कमी करण्यासाठी नॉन-अल्कोहोलिक पेयांचा आहारात करा समावेश
ब्लूबेरी, मध, पुदिना आणि लिंबाचा रस मिक्स करून बनवलेले हनी ब्लूबेरी मिंट मॉकटेल तुम्ही वजन कमी करण्यासाठी पिऊ शकता. हे मॉकटेल प्यायल्यामुळे पोटावरील आणि मानेवरील अतिरिक्त चरबी कमी होऊन वजन कमी होईल.
टरबूज आले मॉकटेल प्यायल्यामुळे पोटावरील चरबी गुळगुळीत होऊन वाढलेल्या वजनात घट होईल. हे मॉकटेल बनवण्यासाठी अगदी सोपे आहे. लिंबामध्ये असलेले गुणधर्म वजन कमी करण्यासाठी मदत करतात.
Untitled design (45)
क्रॅनबेरी ऑरेंज मॉकटेल बनवण्यासाठी अगदी सोपे आहे. ग्लासमध्ये बर्फ, संत्र्याचा रस, क्रॅनबेरीचा रस, आल्याचा रस आणि मॅपल सिरप टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात बर्फाचे खड्डे आणि थंड पाणी टाकून मिक्स करा.
ऍपल आणि रोझमेरीचा वापर करून बनवलेलं पेय आरोग्यासाठी गुणकारी ठरेल. यासाठी सरचंद कापून गरम पाण्यात टाका. नंतर त्यात रोझमेरी टाकून मिक्स करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात बर्फ़ सुद्धा टाकू शकता.