मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा करा समावेश
शरीराला विश्रांतीची जास्त आवश्यकता असते.त्यामुळे नियमित ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. झोपेमुळे संपूर्ण शरीर आणि त्वचा निरोगी राहते.
उन्हाळ्यासह इतर सर्वच दिवसांमध्ये नारळ पाण्याचे नियमित सेवन करावे. नारळ पाण्याच्या सेवनामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. नारळ पाण्याचे सेवन केल्यामुळे चयापचय संतुलित राहते.
दालचिनीच्या पाण्याचे मध टाकून सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. यामध्ये असलेले घटक शरीराचे वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात. त्यामुळे तुम्ही तयार केलेल्या दालचिनीच्या पाण्यात मध मिक्स करून पिऊ शकता.
सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्यास शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी जळून जाईल. यामुळे शरीराचे चयापचय वाढते आणि वजन कमी होण्याच्या प्रक्रियेत अडथळे येत नाहीत.
शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी उपाशी पोटी ग्रीन टी चे सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय शरीराचे चयापचय सुधारते आणि पोट स्वच्छ होते.