(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
काल, दसऱ्याच्या दिवशी, दिल्लीतील प्रसिद्ध लवकुश रामलीला येथे एक संस्मरणीय क्षण पाहायला मिळाला. बॉलीवूड अभिनेता बॉबी देओलने प्रतीकात्मकपणे भगवान रामाची भूमिका साकारली होती आणि रावणाचा वध करण्यासाठी बाण सोडला. यामुळे सत्याच्या असत्यावर विजयाचा शाश्वत संदेश गेला. लाल किल्ल्याच्या मैदानावर जमलेल्या हजारो प्रेक्षकांनी हा भव्य देखावा पाहिला. अभिनेता निखिल द्विवेदी देखील बॉबी देओलसोबत स्टेजवर सामील झाला. बॉबी देओल हातात धनुष्यबाण पाहून चाहते उत्साहित झालेले दिसून आले.
रामाचे आशीर्वाद घेण्याचा घेतला निर्णय
‘लव कुश रामलीला’ समितीचे अध्यक्ष अर्जुन कुमार की, ‘बॉबी देओल हे धार्मिक वृत्तीचे कलाकार आहेत. त्यांनी आपल्या ३० वर्षांच्या फिल्मी करिअरनंतर प्रभू रामचंद्रांच्या शरणेत येण्याचा निर्णय घेतला. समितीच्या निमंत्रणावरून बॉबी देओल या भव्य आयोजनासाठी दिल्लीला आले होते.’ चाहत्यांची गर्दी पाहून अभिनेत्याला देखील आनंद झाला.
VIDEO | Delhi: Actor Bobby Deol performs Ravan Dahan on Vijayadashami at the Luv Kush Ram Leela committee event at Red Fort.#VijayaDasami2025 #RavanaDahan (Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/bshHcPlN2G — Press Trust of India (@PTI_News) October 2, 2025
अनेक कलाकारांची लागली हजेरी
अर्जुन कुमार पुढे म्हणाले, “अनेक प्रमुख चित्रपट कलाकारांनी यापूर्वी लव कुश रामलीलेत भाग घेतला आहे, ज्यात अजय देवगण, करीना कपूर, रोहित शेट्टी, अक्षय कुमार, साऊथ सुपरस्टार प्रभास आणि जॉन अब्राहम यांचा समावेश आहे. सर्वांनी त्यांच्या सहभागाद्वारे भगवान रामप्रती भक्ती व्यक्त केली आहे.” बॉबी देओलच्या उपस्थितीमुळे या समारंभाची शान आणि लोकांचा सहभाग आणखी वाढला, असं समितीने म्हटलं आहे. रावण दहन ही वाईटावर चांगल्याच्या विजयाची पौराणिक परंपरा आहे आणि बॉबी देओलनेही याचा भाग झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
नीता अंबानींनी फाल्गुनी पाठकसोबत खेळाला गरबा, दसरा मोठ्या उत्साहात साजरा; व्हिडिओत दिसली जुगलबंदी
बॉबी देओलची कारकीर्द
बॉबी देओलच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता नुकताच “द बॅड्स ऑफ बॉलीवूड” या सिरीजमध्ये दिसला. चाहत्यांना यामधील अभिनेत्याची भूमिका खूप आवडली. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने या नेटफ्लिक्स मालिकेद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. १८ सप्टेंबर रोजी प्रीमियर झालेल्या या शोमध्ये बॉबीने बॉलीवूड सुपरस्टार अजय तलवारची भूमिका केली होती. तसेच, आता बॉबी देओल लवकरच अनुराग कश्यपच्या दिग्दर्शित “बंदर” चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये सान्या मल्होत्रा अभिनेत्री आहे. तसेच, पुढे विजय आणि पूजा हेगडे अभिनीत “जन नायकन” या तमिळ चित्रपटाचा देखील भाग असणार आहे.






