आजपासून कागदी बाँड हद्दपार तर नव्या E-Bondची एंट्री; राज्य सरकारचा मोठा निर्णय
Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…
ई-बॉण्ड ही एक डिजिटल प्रणाली आहे. या माध्यमातून आयातदार आणि निर्यातदार विविध कस्टम व्यवहारांसाठी वेगवेगळे कागदी बॉण्ड वापरण्याऐवजी एकाच इलेक्ट्रॉनिक बॉण्डद्वारे सर्व प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
महाराष्ट्र शासनाचे नोंदणी व मुद्रांक विभाग, (National E-Governance Services Limited (NeSL)) आणि National Informatics Centre (NIC) यांच्या तांत्रिक सहाय्याने आज “कस्टम ई-बॉण्ड” प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला आहे.
वेट लॉससाठी घरी बनवा Cucumber Salad; सेलिब्रिटींच्याही आवडीची आहे डिश
सर्व व्यवहारांसाठी एकाच बॉण्डचा वापर: प्रोव्हिजनल असेसमेंट्स, एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम्स, वेअरहाऊसिंग, आणि मॅन्युफॅक्चरिंग इन बॉन्डेड वेअरहाऊसेस यासारख्या प्रक्रियांमध्ये वापरता येईल.
पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया: आयातदार/निर्यातदार ICEGATE पोर्टलवरून ई-बॉण्ड तयार करतील, NeSL द्वारे ई-स्टॅम्पिंग व ई-स्वाक्षरी केली जाईल आणि कस्टम अधिकाऱ्यांकडून ऑनलाईन पडताळणी होईल.
ऑनलाईन शुल्क भरणे: मुद्रांक शुल्कासह सर्व शुल्क ऑनलाइन भरणे शक्य, ज्यामुळे कागदी स्टॅम्पची आवश्यकता संपुष्टात येईल.
आधार आधारित ई-स्वाक्षरी: आयातदार/निर्यातदार तसेच कस्टम अधिकाऱ्यांच्या ई-स्वाक्षरीमुळे व्यवहार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होतील.
पर्यावरण पूरक (‘ग्रीन गव्हर्नन्स’): कागदपत्रांचा वापर टाळल्यामुळे पर्यावरणास लाभ.
तत्काळ पडताळणी: रिअल-टाईम पडताळणीमुळे फसवणुकीवर आळा.
सुलभ बदल आणि रक्कमवाढ: पूर्वीच्या बॉण्डमध्ये आवश्यक बदल किंवा रक्कमवाढ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करता येईल.
व्यवसायासाठी सुलभ: सीमाशुल्क प्रक्रिया गतिमान, व्यवसाय सुलभ आणि “डिजिटल इंडिया” तसेच “Ease of Doing Business” उपक्रमांना चालना.
या नव्या ई-बॉण्ड प्रणालीमुळे कस्टम व्यवहार अधिक वेगवान, सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहेत. तसेच व्यवसायिकांचा मार्गही सुकर होणार आहे.






