भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिनी झालेल्या राडा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. भारतीय क्रिकेट चाहते सध्या भारतीय संघाची बाजू मांडत आहेत तर इंग्लंडचे अनेक दिग्गज हे इंग्लंडच्या बाजूने बोलत आहे. कालच्या या भांडणाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत नजर टाका.
भारत विरूद्ध इंग्लड सामन्यात झालेल्या राड्याचे कोही खास फोटो. फोटो सौजन्य - X
लॉर्ड्सवर सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस वातावरण तापले. जॅक क्रॉलीच्या हलक्याफुलक्या कृत्यांमुळे टीम इंडिया संतापली आणि कर्णधार शुभमन गिलचा संयम सुटला. फोटो सौजन्य - X
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वीच भारतीय डाव ३८७ धावांवर मर्यादित झाला. सामन्यात १०-१५ मिनिटे खेळ शिल्लक होता. इंग्लंडवर विकेटसाठी दबाव आणण्यासाठी भारताला येथे २-३ षटके टाकायची होती आणि इंग्लिश सलामीवीर फक्त वेळ वाया घालवू पाहत होते. फोटो सौजन्य - X
क्रॉली सतत वेळ वाया घालवत असताना, स्लिपवर उभ्या असलेल्या शुभमन गिलने इंग्लंडच्या सलामीवीराला काही शिवीगाळही केली. जसप्रीत बुमराहने पहिले षटक टाकले आणि यादरम्यान जॅक क्रॉलीने वेळ वाया घालवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. फोटो सौजन्य - X
क्रॉलीची ही कृती पाहून शुभमन गिल संतापला आणि त्याने त्याला बोटही दाखवले. जॅक क्रॉलीच्या या नाट्यावर फक्त शुभमन गिलच रागावला असे नाही तर संपूर्ण भारतीय संघ कर्णधारासोबत दिसला आणि त्याने क्रॉलीला जोरदार फटकारले. फोटो सौजन्य - X
बोटावर चेंडू आदळल्याचे नाटक केल्यानंतर जॅक क्रॉलीने फिजिओला मैदानावर बोलावले तेव्हा शुभमन गिलसह भारतीय खेळाडूंनी खूप टाळ्या वाजवल्या आणि शेवटी गिलनेही इंग्लिश फलंदाजाची खिल्ली उडवली. फोटो सौजन्य - X