अनेकांना चित्रपटगृहात जाऊन सिमेना पाहायला फार आवडतं. चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहण्याची मज्जाच वेगळी असते. अनेकजण त्यांच्या मित्रांसोबत आणि कुटूंबासोबत चित्रपटगृहात सिनेमा पाहायला जातात. आजच्या काळात शेकडो चित्रपटगृह आपल्या देशात आहेत. पण देशातील पहिलं चित्रपटगृह कोणतं आहे, तुम्हाला माहीत आहे का?
फिल्मी सिटी असणाऱ्या मुंबईत नाही तर 'या' शहरात आहे भारतातील पहिलं चित्रपटगृह! (फोटो सौजन्य - pinterest)

फिल्म इंडस्ट्रीबद्दल म्हटलं तर आपल्या मनात सर्वात आधी येणार शहरं म्हणजे मुंबई. स्वप्नांचं शहर म्हटलं जाणाऱ्या मुंबईला कलाकार, अभिनेत्यांचा वारसा आहे.

मुंबईत शेकडो लोकं त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. मुंबईतील फिल्म सिटी खूप प्रसिध्द आहे. त्यामुळे पहिलं चित्रपटगृह मुंबईतच असेल असं तुम्हाला वाटतय का?

फिल्म सिटी असणाऱ्या मुंबईत नाही तर कोलकात्यामध्ये देशातील पहिलं चित्रपटगृह आहे.

cinema hall (1)

आधी या चित्रपटगृहाचं नाव एलफिंस्टन पॅलेस होतं, त्यानंतर हे नाव मिनर्वा करण्यात आलं. आता या चित्रपटगृहाचं नाव चॅपलिन सिनेमा असं आहे.

1911 मध्ये मुंबईतील रॉयल चित्रपटगृहाची स्थापना झाली, तर दिल्लीत रीगल चित्रपटगृह उभारलं.






