आरोेग्यासाठी देखील मीठ गुणकारी आहे. मात्र बाजारात सध्या एका वेगळ्याच मीठाची चर्चा सुरु आहे. असं म्हटलं जातं आहे की हे मीठ विकत घेणं फक्त आणि फक्त श्रीमंतांना परवडणारं आहे. पांढरं मीठ सैंधव मीठ असे काही मीठाचे प्रकार सर्वसाधारण प्रत्येकाला माहित आहेत. मात्र हे मीठ त्याला अपवाद आहे. असं कोणत्या मीठाची चर्चा सर्वत्र होतेय ते जाणून घेऊयात.
जेवणाची लज्जत वाढते त्यातल्या जिन्नस आणि मसाल्यांमुळे. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं असतं ते मीठ. मीठामुळे जेवणाची चव वाढते.
आरोेग्यासाठी देखील मीठ गुणकारी आहे. मात्र बाजारात सध्या एका वेगळ्याच मीठाची चर्चा सुरु आहे. असं म्हटलं जातं आहे की हे मीठ विकत घेणं फक्त आणि फक्त श्रीमंतांना परवडणारं आहे.
पांढरं मीठ सैंधव मीठ असे काही मीठाचे प्रकार सर्वसाधारण प्रत्येकाला माहित आहेत. मात्र हे मीठ त्याला अपवाद आहे.
श्रीमंतांना पडवणारं आणि सोन्याच्या भावाने विकलं जाणाऱ्या या मीठाचं नाव आहे 'कोरियन बॅम्बू सॉल्ट'. कोरियामध्ये तयार होणारं हे मीठ जगतीलं सर्वात महागडं मीठ आहे.
या मीठाला संपूर्णपणे तयार होण्यासाठी 45 दिवसांचा कालावधी लागतो. या दिवसांत मीठावर 8 ते 9 वेळा हिटींग प्रक्रिया होते.
सर्वात जास्त पोषक तत्व या मीठात आढळतात असं संशोधनातून उघड झालं आहे.
या मीठाच्या प्रक्रियेसाठी बांबूूचा वापर केला जातो. कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम असे शरीराला पोषण देणारे घटक यात असल्याने या किलोभर मीठाची किंमत 30 हजार रुपये इतकी आहे.