सरांश-कार्तिकेय जोडीसमोर दक्षिण झोनचा डाव गडगडला (फोटो-सोशल मीडिया)
मध्य झोन संघाकडून नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या संघाचा हा निर्णय चांगलाच फायदेशीर ठरला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण झोनची सुरुवात खूपच वाईट झाली. मोहित काळे ९ धावा काढून स्वस्तात बाद झाला. त्यानंतर रविचंद्रन स्मरन देखील १ धावा काढून झटपट बाद झाला. येथून मात्र दक्षिण झोन संघाच्या विकेट पडण्यास सुरुवात झाली.
स्मरननंतर, रिकी भुई १५ धावा काढून माघारी गेला. मोहम्मद अझरुद्दीन देखील या सामन्यात काही खास करू शकला नाही. तो फक्त ४ धावा काढून माघारी परतला. तर सलामीवीर तन्मय अग्रवाल या डावात सर्वाधिक ३१ धावा काढून बाद झाला. तो या डावातील सर्वोत्तम फलंदाज ठरला. दक्षिण झोनने ६५ धावांवरच आपल्या पाच विकेट गामावल्या होत्या. सी आंद्रे सिद्धार्थ आणि सलमान निजार यांनी थोडा प्रतिकर करत ३२ धावा जोडल्या.पण, सिद्धार्थ १२ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर माघारी परतला.
सिद्धार्थ बाद झाल्यानंतर सलमान निजार देखील २४ धावा काढून बाद झाला. शेवटी, अंकित शर्माने २० आणि एमडी निधीशने १२ धावा करून धावसंख्या १५० धावांपर्यंत पोहचवली. दक्षिण झोनने ६३ षटकांत सर्वबाद १४९ धावा केल्या आहेत. मध्य विभागाकडून गोलंदाजी करताना सरांश जैनने सर्वाधिक ५ बळी घेतले तर कुमार कार्तिकेयने ४ गडी बाद केले. या दोघांनी दक्षिण विभागाचे कंबरडे मोडले. तीन वेगवान गोलंदाजांनी १८ षटके टाकली. तर दोन्ही फिरकी गोलंदाजांनी मिळून ४५ षटके टाकली.
हेही वाचा : मोठी बातमी! IND VS PAK सामन्यावर बहिष्कार? माजी क्रिकेटपटूने थोपटले दंड; म्हणाला, ‘सामना पाहणार नाही..
प्रतिउत्तरात मध्य विभागाने पहिल्या दिवशी एकही गडी न गमावता ५० धावा केल्या आहेत. मध्य विभागाकडून दानिश मालेवार आणि अक्षय वाडकर यांनी डावाची सुरवात केली. या दोघांनी एकही बळी न गमावता ५० धावांची भागीदारी रचली. दानिश मालेवारने नाबाद २८ धावा काढत खेळत आहे आणि अक्षय २० धावा काढत नाबाद आहे.






