आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ विजेता क्रिकेटपटू कुलदीप यादवने त्याची बालपणीची मैत्रीण वंशिका चड्ढा हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे. शनिवारी (१४ मार्च) त्यांनी उत्तराखंडमधील मसूरी येथील आयटीसी हॉटेल्स द सॅव्हॉयच्या वेलकॉमहॉटेलमध्ये सात फेरे घेतले. या दरम्यान टीम इंडियाचे अनेक मोठे क्रिकेटपटू सहभागी झाले होते.
फोटो सौजन्य - Instagram

उत्तराखंडमधील मसूरी येथे झालेल्या लग्नानंतर, भारतीय क्रिकेट संघाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव रविवारी डिफेन्स कॉलनीतील त्याच्या घरी पोहोचला. कुलदीप आणि वंशिकाचे रेड कार्पेटवर स्वागत करण्यात आले. फोटो सौजन्य - Instagram

या विवाह सोहळ्याच्या फोटोंमध्ये कुलदीप सोनेरी रंगाचा कुर्ता आणि त्याच्या पत्नीने लाल रंगाचा लेहगा घातला होता. कुलदीपने त्याच्या सोशल मिडियावर लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत यामध्ये ते दोघेही रोमॅंटिक पोझ देताना दिसत आहेत. फोटो सौजन्य - Instagram

फुलांच्या वर्षाव आणि बँडच्या आवाजात कुलदीप पत्नी वंशिकासह घरात प्रवेश केला. १७ मार्च रोजी लखनौमधील हॉटेल सेंट्रम येथे होणाऱ्या स्वागत समारंभाची तयारी आता सुरू झाली आहे. चित्रपट सितारे आणि राजकारण्यांसह भारत आणि परदेशातील अनेक क्रिकेटपटू उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. फोटो सौजन्य - Instagram

नवविवाहित जोडप्याच्या स्वागतासाठी डिफेन्स कॉलनीतील घर फुलांनी सजवण्यात आले आहे. १७ मार्च रोजी लखनौमध्ये होणाऱ्या रिसेप्शनला अनेक परदेशी क्रिकेटपटू देखील उपस्थित राहू शकतात असे वृत्त आहे. फोटो सौजन्य - Instagram

मसूरी येथील लग्न समारंभात बागेश्वर धामचे मुख्य पुजारी पंडित धीरेंद्र शास्त्री, क्रिकेटपटू रिंकू सिंग, भुवनेश्वर कुमार, तिलक वर्मा, युजवेंद्र चहल आणि इतर अनेक खेळाडू उपस्थित होते. फोटो सौजन्य - Instagram






