स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' पुन्हा एकदा मोठ्या ट्विस्टमुळे चर्चेत आली आहे. सायलीच्या डोहाळजेवणाचा आनंद सुरू असतानाच अचानक पोलीस घरात येऊन तिला ताब्यात घेतात.
Tharala Tar Mag serial new promo got million views (Photo सौजन्य-सौशलमीडिया)

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सायली आणि अर्जुनच्या आयुष्यात आनंदाचे क्षण सुरू असतानाच कथेत असा ट्विस्ट येणार आहे, ज्यामुळे प्रेक्षकही हादरणार आहेत.

घरात डोहाळ जेवणाचा आनंद सुरू असताना वातावरण अचानक बदलते. कार्यक्रम सुरू असतानाच पोलीस येतात आणि सायलीला ताब्यात घेतात. या घटनेमुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला मोठा धक्का बसतो.

सायलीवर अनाथाश्रमातील मुलींच्या तस्करीसारखा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हा आरोप खरा की कोणाचा कट, याचं उत्तर अजून समोर आलेलं नाही. त्यामुळे मालिकेतील पुढील भागांविषयी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. काही तासांतच लाखो लोकांनी तो पाहिला. अनेक प्रेक्षकांनी सायलीला न्याय मिळावा, अशी भावना व्यक्त करत कमेंट्सद्वारे पाठिंबा दिला.

या नव्या ट्विस्टला मिळालेल्या प्रतिसादामुळे अभिनेत्री जुई गडकरीही भारावून गेली. प्रेक्षकांनी गेली अनेक वर्षे मालिकेवर प्रेम केलं आणि प्रत्येक टप्प्यावर साथ दिली. पुढील कथा आणखी रंजक असेल, असा विश्वास तिने व्यक्त केला.

सायलीवर संकट ओढवलं असलं तरी ती शांत बसणार नाही. स्वतःवरील आरोप खोटे असल्याचं सिद्ध करण्यासाठी ती संघर्ष करणार आहे. आपल्या कुटुंबासाठी, होणाऱ्या बाळासाठी आणि सत्य बाहेर आणण्यासाठी तिची ही लढाई प्रेक्षकांना पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.






