श्रावण महिन्यात उपवासाच्या दिवशी साबुदाण्यांपासून बनवा 'हे' चविष्ट पदार्थ
सकाळच्या घाईगडबडीमध्ये तुम्ही साबुदाण्यांपासून पुडिंग बनवून खाऊ शकता. त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या फळांचा वापर करू शकता. उपवासाच्या दिवशी किंवा इतर वेळी सकाळच्या नाश्त्यात साबुदाणे पुडिंग बनवल्यास चवीला अतिशय सुंदर लागेल.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं साबुदाणा वडा खायला खूप जास्त आवडतो. साबुदाणा वडा काकडीची चटणी किंवा दह्यासोबत सुंदर लागतो.
सणावाराच्या दिवसांमध्ये नेहमीच बाजारातून विकत बर्फी आणली जाते. अशावेळी तुम्ही साबुदाण्याची बर्फी बनवू शकता. साबुदाणा बर्फी खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळेल.
उपवासाच्या दिवशी घरात बनवला जाणारा प्रमुख पदार्थ म्हणजे साबुदाणा खिचडी. शेंगदाणे आणि इतर पदार्थांचा वापर करून साबुदाणा खिचडी बनवली जाते.
श्रावण महिन्यातील नैवेद्यासाठी तुम्ही साबुदाणा खीर बनवू शकता. तसेच इतर वेळी भूक लागल्यानंतर किंवा घरात पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी तुम्ही साबुदाणा खीर बनवू शकता.