
१० मिनिटांमध्ये वाटीभर चणाडाळीपासून बनवा स्वादिष्ट हलवा
चणाडाळीचा वापर प्रामुख्याने पुरणपोळी बनवण्यासाठी केला जातो. घरातील प्रत्येकाला पुरणपोळी खायला खूप जास्त आवडते. पण पुरणपोळी बनवण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. पुरण तयार करताना बऱ्याचदा महिलांची चूक होते, ज्यामुळे पदार्थाची चव पूर्णपणे खराब होऊन जाते. रोजच्या धावपळीमध्ये पुरणपोळी बनवणे शक्य होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चणाडाळीचा हलवा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. यापूर्वी तुम्ही गाजर हलवा किंवा मूगडाळीचा हलवा खाल्ला असेल. चणाडाळीपासून बनवले जाणारे पारंपरिक पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. हा पदार्थ १० मिनिटांमध्ये झटपट तुम्ही बनवू शकता. घरात कोणालाही गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास चणाडाळीचा हलवा बनवावा. चणाडाळ खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते. यामुळे असलेले घटक शरीराला तात्काळ ऊर्जा देतात आणि आरोग्य सुधारतात. नेहमीच बाहेरील विकतचे पदार्थ आणून खाण्याची आवश्यकता नाही. सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही घरीच गोड पदार्थ बनवू शकता. चला तर जाणून घेऊया चणाडाळ हलवा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
रविवार होईल आणखीनच स्पेशल! रात्रीच्या जेवणात गरमागरम भाकरीसोबत बनवा झणझणीत मालवणी चिकन सुक्का