लहान मुलांच्या डब्यासाठी बनवा 'या' प्रकारचे टेस्टी आणि पौष्टिक सँडविच
हिरवी चटणी आणि दह्याचा वापर करून बनवलेले सँडविच चवीला अतिशय सुंदर लागते. याशिवाय तुम्ही यामध्ये वेग्वेगळ्या भाज्या आणि पानांचा वापर करू शकता.
पनीर घालून तयार केलेले चविष्ट सँडविच लहान मुलांना नक्कीच आवडेल. नेहमीच बाजारात विकत मिळणारे सँडविच खाण्यापेक्षा घरी बनवलेले हेल्दी आणि टेस्टी सँडविच खावे.
चीज, काकडी आणि कांदा, टोमॅटोचा वापर करून बनवलेले सँडविच लहान मुलांसह मोठ्यांना सुद्धा खूप जास्त आवडते. हे सँडविच बनवण्यासाठी ५ मिनिटांचा वेळ लागतो.
बटाट्याची भाजी भरून बनवलेले मसाला सँडविच अतिशय लोकप्रिय आहे. हे सँडविच तुम्ही झटपट घरात सुद्धा बनवू शकता.विविध भाज्या आणि बटाट्याची भाजी वापरून बनवलेले सँडविच टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणी सोबत सुंदर लागते.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मक्याचे दाणे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. मक्याच्या दाण्यांचा वापर करून बनवलेले सँडविच लहान मुलांना खूप जास्त आवडेल.