जगभरात अनेक रुग्ण मधुमेह या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. मधुमेह झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. हळूहळू रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागल्यानंतर आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. मधुमेह झाल्यानंतर पथ्य न पाळल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर इतर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर डॉक्टरांच्या गोळ्यांसोबतच घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय करणे सुद्धा आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या मसाल्याचे पाणी प्यावे, याबद्दल सांगणार आहोत. या मसाल्यांचे पाणी प्यायल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहील.(फोटो सौजन्य-istock)
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी कोमट पाण्यात मिक्स करा 'हे' मसाले

लवंगामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फिनोलिक घटक असतात. त्यामुळे रात्री झोपण्याआधी एक ग्लास पाण्यात ४ लवंग भिजत घालून ठेवाव्यात. त्यानंतर सकाळी उठल्यावर हे पाणी प्यायल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहील.

आल्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे मधुमेहासारख्या गंभीर आजारावर नियंत्रण मिळते. सकाळी उठल्यानंतर रोज अर्धा ग्लास आल्याचे पाणी प्यायल्यास मधुमेह नियंत्रणात राहील.

मेथीच्या दाण्यांमध्ये असलेल्या फायबरमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. ग्लुकोजचे शोषण कमी प्रमाणात झाल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही.

जेवनंती पदार्थ बनवण्यासाठी हळदीचा वापर केला जातो.आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली हळद आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आढळून येतो.

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी कोमट पाण्यात दालचिनीचे पाणी प्यायल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील. दालचिनीमध्ये बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स आढळून येतात, ज्यामुळे इंसुलिनची संवेदनशीलता वाढून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.






