एका तिकीटासाठी जीवाशी खेळ! महिलेचा रेल्वेतून जीवघेणा प्रवास, व्हायरल VIDEO पाहून येईल अंगावर काटा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल एक वृद्ध महिला रेल्वेच्या दरवाजाबाहेरील ‘फूटबोर्ड’वर बसून प्रवास करताना दिसत आहे. यामुळे तिचा जीव गंभीर धोक्यत आहे. रेल्वे प्रचंड वेगाने धावत असून दरवाजाही उघडा आहे. तसेच फुटबोर्डही मागेपुढे सरकताना दिसत आहे. चुकूनही महिलेचा तोल गेला, तिचा पाय घसरला तर गंभीर दुर्घटना घडू शकते. यामध्ये महिलेचा मृत्यूही होऊ शकतो. परंतु तरीही महिला हा धोकादायक प्रवास करत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये हालाकीच्या परिस्थितीमुळे महिलेला अशा प्रकारे प्रवास करावा लागत असल्याचे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
थरारक! भारतात पसरतोय झोम्बी? Blinkit बॉयनंतर आणखी तरुण अडकला विळख्यात, व्हायरल VIDEO मुळे खळबळ
व्हायरल व्हिडिओ
गरीबी बहुत बुरी होती है मौ@त से
भी समझोता कर लेती है उपर वाला
ऐसी बजबूरी किसी को ना दे😢 pic.twitter.com/MTvRAd4OMM — S marwadi (@s___marwadi786) April 1, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @s___marwadi786 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी महिलेच्या जीवाची चिंता व्यक्त केली आहे. एका नेटकऱ्याने दारिद्र्य खरंच भयानक असतं असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने परिस्थिती माणसाला मृत्यूशी तडजोड करायला शिकवते असे म्हटले आहे. अनेकांनी महिलेला मदत करण्यासाठी देखील पुढाकार घेतला आहे.
परंतु काही तज्ज्ञांच्या मते, अनेक लोक तिकीट काढावे लागू नये यासाठी अशा प्रकारे धोकादायक प्रवास करतात. यापूर्वी देखील असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. जिथे लोक ट्रेनला लटकून प्रवास करत आहे, तर कोणी ट्रेनच्या छतावर चढून प्रवास करत आहे. यामुळे अनेकांचा बळी गेला आहे. यामुळे केवळ एका तिकाटासाठी, काहीश्या पैशासाठी मृत्यूशी खेळ करताना लोक दिसत आहेत. या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे.
मानवाच्या अट्टाहासाची ठरली बळी! जयपूरच्या गुलाबी रंगवलेल्या हत्तीणीचा दुर्दैवी मृत्यू
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






