अभिनेत्री मौनी रॉय ही कायम तिच्या फॅशन मुळे चर्चेत असते तिच्या फॅशन वॉर्डरोबमध्येही तितकीच विविधता आहे. मौनी रॉयच्या स्टाइलच कायम अनेकजण कौतुक करतात कारण अभिनयाच्या सोबतीने तीच फॅशन सेन्स देखील तितकाच कमाल आहे. पारंपरिक कपड्या पासून अगदी वेस्टर्न लुक्सपर्यंत तिच्या लूक्सच्या चर्चा बघायला मिळतात. मिनिमलिस्ट असो, मॅक्सिमलिस्ट असो, ‘द्रेप्ड देवी’ असो किंवा ‘रिस्क-टेकर’... मौनी रॉय प्रत्येक लूकमध्ये आपली वेगळी स्टाइल दाखवते.
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया) अभिनेत्री मौनी रॉयचे पाच फॅशनेबल लुक्स !

द्रेप्ड देवी - सोनेरी नक्षीदार ब्लाउजसोबत नेसलेली पांढरी सिल्क साडी, कानात उठून दिसणारे झुमके आणि पार्श्वभूमीला निळाशार भूमध्य समुद्र... मौनी रॉयचा हा लूक अगदी एखाद्या चित्रासारखा भासतो.

द रिस्क-टेकर- सिल्व्हर आर्ट डेको आर्किटेक्चरल डिटेलिंग असलेला भरपूर दागिन्यांनी सजवलेला स्ट्रॅपलेस कॉर्सेट, आणि त्यासोबत फिरकी घेताना टिपलेला लहरता शीअर काळा सिक्विन्ड बॉलगाउन स्कर्ट. हा असा लुक आहे ज्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या धाडसाची गरज असते, आणि मौनी ते धाडस जणू तिच्या सहाव्या आउटफिटसारखं परिधान करते.

मॅक्सिमलिस्ट -शिल्पाकृती 3D जिओमेट्रिक गोल्ड स्टारडस्ट कॉर्सेट आणि त्यासोबतचा सॅटिन हाय-स्लिट स्कर्ट... मौनीचा हा लूक अगदी ग्लॅमरस आणि हटके आहे. काळ्या पार्श्वभूमीवर टिपण्यात आलेल्या या लूकमध्ये तिच्या आउटफिटलाच केंद्रस्थानी ठेवण्यात आलं आहे.

मिनिमलिस्ट- गाठ बांधलेला पांढरा शर्ट, काळी वाइड-लेग ट्राउझर्स, चंकी लोफर्स, आणि लक्ष वेधून घेण्याची मागणी करणारी एकही अॅक्सेसरी नाही, संयम हीदेखील स्वतःची एक ताकद आहे हे सिद्ध करणारी ही मौनी. संपूर्ण लुक म्हणजे शांत आत्मविश्वासाचा एक सराव आहे, आणि ती त्यात विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण होते.

रेड कार्पेट ब्युटी- स्लीक काळा स्ट्रॅपलेस बोडिस आणि सोनेरी क्रिस्टलने सजलेला मरमेड स्कर्ट, त्याला जोडलेली लांब ट्रेल आणि पार्श्वभूमीला संध्याकाळच्या प्रकाशात न्हाऊन निघालेलं कान्स शहर... मौनी रॉयचा हा लूक अगदी शोस्टॉपिंग ठरतो.






