नवरात्री उत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यंदाच्या वर्षी २२ सप्टेंबरपासून नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्रीमध्ये देवीची घटस्थापना करून मनोभावे पूजा केली जाते. तर अनेक ठिकाणी गरबा आणि दांडियाचे आयोजन केले जाते. याशिवाय नवरात्री उत्सवाला सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे एक वेगळाच उत्साह असतो. पारंपरिक पद्धतीनं फॉलो करत सण साजरा केले जाते. याशिवाय महिला हातांवर मेहंदी काढतात आणि पायांवर आल्ता लावला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पायांवरील आल्ता लावण्याच्या काही सुंदर डिझाईन्स सांगणार आहोत. (फोटो सौजन्य: Pinterest)
नवरात्री उत्सवात पायांना लावा 'या' सुंदर डिझाईन्सचा आल्ता, पाय दिसतील उठावदार
नवरात्रीमध्ये महिला परंपरा म्हणून पायांवर आल्ता लावतात. आल्ता लावल्यामुळे पाय अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतात. पायांचे सौंदर्या आणखीनच खुलून दिसते.
बाजारात अनेक वेगवेगळ्या आल्ता डिझाईन उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही पानाफुलांचे सुंदर नक्षीकाम करून पायांवर आल्ता काढू शकता.
पायांच्याबी मध्यभागी सुंदर फुले काढून बाजूने पांढऱ्या गंधने सुंदर सुंदर नक्षीकाम करू शकता. गोल ठिपके अतिश सुंदर दिसतात.
काहींना संपूर्ण पायांवर आल्ता लावायला खूप जास्त आवडतो. त्यामुळे या डिझाईनचा आल्ता पायांवर काढू शकता. बारीक काठीने पायांवर आल्ता काढला जातो.
काहींना पायांवर अतिशय युनिक डिझाईन हवी असते. त्यामुळे तुम्ही या डिझाईनचा आल्ता पायांवर काढू शकता.