भाईंदर पूर्व गोडदेव गावातील पाण्याच्या टाकीच्या कामात निष्काळजीपणा समोर आला आहे. काम सुरू असताना तब्बल १०० किलो लोखंडी भाग थेट रस्त्यावर कोसळला, जिथे शाळकरी विद्यार्थी आणि ग्रामस्थांची वर्दळ सुरू होती.या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.कामगारांनी सेफ्टी हेल्मेट, बेल्ट न वापरता काम केल्याचे देखील उघड झाले आहे.याआधीही दोन महिन्यात अनेक अपघात घडले असून, परिस्थिती अजूनही धोकादायक आहे.संतप्त ग्रामस्थ आणि शिवसैनिकांचा आक्रमक विरोध“सुरक्षा उपाय न केल्यास काम होऊ देणार नाही,” असा इशारा कंत्राटदारांना देण्यात आला आहे.या आंदोलनात शिवसेना विधानसभा प्रमुख सचिन मांजरेकर, युवा सेना लोकसभा अध्यक्ष पवन घरत यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.