टाळूवरील त्वचा वारंवार कोरडी पडते? मग स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचा करा वापर
वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यासह त्वचा आणि केसांवर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे केसांची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. केस स्वच्छ करण्यासाठी महिला वेगवेगळ्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. कधी हेअरमास्क लावला जातो तर कधी हेअर लोशन लावून केसांची काळजी घेतली जाते. पण तरीसुद्धा टाळूवरील त्वचा कायमच कोरडी दिसते. टाळूवरील त्वचा कोरडी झाल्यानंतर केसांमध्ये चिकटपणा वाढतो, यामुळे कोंडा होणे, केस गळणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या केमिकल युक्त ट्रीटमेंट करून घेतात. पण यामुळे काहीकाळच केस सुंदर दिसतात. मात्र कालांतराने पुन्हा एकदा केस होते तसेच होऊन जातात.(फोटो सौजन्य – istock)
केस गळून टक्कल पडेल अशी भीती वाटते? मग फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, वेगाने होईल केसांची वाढ
टाळूवरील त्वचा कोरडी पडल्यानंतर स्काल्पला खाज येणे, पांढरेशुभ्र पापुद्रे हळूहळू निघण्यास सुरुवात होते. त्यामुळे काहीवेळा फंगल इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला टाळूवरील कोरडेपणा कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील कोणत्या पदार्थांचा वापर करून मसाज करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. टाळूवरील त्वचेवर मसाज केल्यामुळे रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते आणि त्वचेमधील हायड्रेशन कायमच टिकून राहते. स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर केल्यामुळे त्वचा चमकदार राहते.
सर्वच घरांमध्ये खोबरेल तेल उपलब्ध असते. खोबरेल तेलाचा वापर स्वयंपाक घरातील पदार्थ बनवण्यापासून ते अगदी त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी सुद्धा केला जातो. केस धुवण्याच्या आधल्या रात्री खोबरेल तेल हलकेसे गरम करून केसांवर मसाज करा. यामुळे टाळूवरील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. केस सुंदर होतील. त्यानंतर सकाळी केस पाण्याने स्वच्छ धुवावे. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास टाळूवरील त्वचा अधिक स्वच्छ होईल.
मागील अनेक वर्षांपासून त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी कोरफड जेलचा वापर केला जात आहे. वाटीमध्ये ताज्या कोरफडचा रस घेऊन केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे लावून घ्या. त्यानंतर हलक्या हाताने केसांवर मसाज करा. यामुळे टाळूवरील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल आणि केस स्वच्छ होतील. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा हा उपाय केल्यास टाळूवरील त्वचा हायड्रेट राहील आणि कोंडा कमी होईल.