जालना शहर आणि परिसरात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे दोन महिलांचा मृत्यू झाला असून एक महिला जखमी झाली आहे.
चमडाबाजार भागात भिंत अंगावर कोसळून 60 वर्षीय सुमन घोडेकर यांचा मृत्यू झाला.बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव येथे 65 वर्षीय शारदाबाई शिरीसुंदर पुराच्या पाण्यात वाहून गेल्या असून त्यांचा मृतदेह अजूनही शोधला जात आहे.जालना, अंबड आणि घनसावंगी तालुक्यांत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाचा तातडीने पंचनामे करण्याचा आदेश दिला आहे. या पंचनाम्यानंतर पीक नुकसानीचा अहवाल लवकरच मिळणार असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.