(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘दशावतार’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. ‘दशावतार’ची बॉक्स ऑफिस वरील कमाई दिवसेंदिसव वाढतच आहे. चित्रपटाने अवघ्या ३ दिवसांत ५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आणि मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाने नवा रेकॉर्ड बनवला आहे.
sacnilkच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाचे आतापर्यंतचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन आता ५ कोटीहून अधिक झाले आहे. आणि हा आकडा आणखी पुढे वाढण्याची शक्यता आहे. ‘दशावतार’ सिनेमाने पहिल्याच दिवशी ५८ लाखांची कमाई केली आहे. तसेच, दुसऱ्या दिवशी चित्रपटाने १.३९ कोटींची कमाई केली. तर तिसऱ्या दिवशी चित्रपटाची २.४ कोटींपर्यंत गेली. तसेच ‘आरपार’ आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपटांपेक्षा दशावतारची कमाई जास्त आहे.
पाचव्या दिवशी या कमाईत आणखी वाढ झाली असून चित्रपटाने आता १.३० कोटींचा गल्ला जमवला आहे. दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘दशावतार’ने पाच दिवसात एकूण ६.८० कोटींची कमाई केली आहे. ‘दशावतार’च्या पहिल्याच दिवशीचा प्रतिसाद पाहून थिएटरमधील शो वाढवण्यात आले होते. ज्याचा फायदा चित्रपटाला जास्त झाला आहे. मंगळवारी थिएटरमध्ये ९९ रुपयांत तिकिट विक्री करण्यात आली. ज्याचा फायदाही सिनेमाला चांगलाच झाला आणि मंगळवारी चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे.
‘दशावतार’ चित्रपटासोबतच मराठी चित्रपट ‘आरपार’ आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’ हे देखील प्रदर्शित झाले आहेत. या सिनेमांच्या तुलनेत दशावतारने पहिल्या दिवशी दमदार ओपनिंग केली आहे. आणि आपला पाट भक्कम केला आहे. ‘दशावतार’ चित्रपटामधील संपूर्ण स्टारकास्टचा अभिनय पाहण्यासारखा आहे. सगळ्यांचे कामाचे लोकं कौतुक करत आहेत. ‘दशावतार’ चित्रपटाचा प्रभाव हा चित्रपटगृहातून बाहेर आल्यावरही प्रेक्षकांच्या मनावर राहत आहे. आता हा चित्रपट पुढे आणखी किती कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.