Independence Day निमित्त घरी बनवा 'हे' खास तिरंगी पदार्थ
घरातील लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं भात खायला खूप जास्त आवडतो. त्यामुळे तुम्ही १५ ऑगस्टच्या दिवशी घरात तिरंगा पुलाव बनवू शकता. नैसर्गिक रंगांचा वापर करून बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागेल.
निरोगी आणि कायमच हेल्दी राहण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात स्मूदी बनवून प्यायली जाते. घाईगडबडीच्या वेळी तिरंगा स्मूदी बनवून पिऊ शकता. दूध आणि वेगवेगळ्या फळांचा वापर करून बनवलेली स्मूदी चवीला अतिशय सुंदर लागते.
कामाच्या धावपळीमध्ये नाश्त्यात काय बनवावं सुचत नाही. अशावेळी वेगवेगळ्या भाज्या आणि फळांचा वापर करून तुम्ही तिरंगा सँडविच बनवू शकता. तीन वेगवेगळ्या भाज्या यामध्ये तुम्ही वापरू शकता.
सुट्टीच्या दिवशी अनेक घरांमध्ये इडली, डोसा बनवला जातो. त्यामुळे १५ ऑगस्टला तुम्ही तीन रंगाचा वापर करून इडली बनवू शकता. तिरंगा इडली पाहून लहान मुलं खूप खुश होतील.
लहान मुलांना आवडणारा पदार्थ म्हणजे आईस्क्रीम. वेगवेगळ्या फळांचा वापर करून बनवलेली रंगीत आईस्क्रीम चवीला अतिशय सुंदर लागते.