Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फराह खानची फेव्हरेट डिश ‘यखनी पुलाव’ ची सोपी रेसिपी, खवय्यांच्या जिभेवर विरघळते याची चव

Yakhni Pulao Recipe : हिंदी सिनेश्रुष्टीतील फेमस दिग्दर्शक फराह खान यांच्या खाद्यप्रेमाबद्दल सर्वांनाच ठाऊक आहे. त्यांच्या आवडीच्या पदार्थाची रेसिपी आज आपण जाणून घेणार आहोत.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 04, 2025 | 02:40 PM
फराह खानची फेव्हरेट डिश 'यखनी पुलाव' ची सोपी रेसिपी, खवय्यांच्या जिभेवर विरघळते याची चव

फराह खानची फेव्हरेट डिश 'यखनी पुलाव' ची सोपी रेसिपी, खवय्यांच्या जिभेवर विरघळते याची चव

Follow Us
Follow Us:

भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये बिर्याणी आणि पुलाव यांना एक वेगळंच स्थान आहे. जेवणाच्या टेबलावर बिर्याणी आली की सगळे खुश होतात, पण पुलावाची चव हीदेखील तितकीच खास आहे. बिर्याणी मसालेदार, जडसर आणि तेलकट असते, तर पुलाव थोडासा सौम्य, सुगंधी आणि हलका वाटतो. यामध्ये वापरले जाणारे मसाले, भात आणि मांस किंवा भाज्या एकत्र येऊन जी अप्रतिम चव निर्माण करतात, ती खवय्यांच्या जिभेवर कायमची ठसते.

गल्ली गल्लीत फेमस असा ‘जीनी डोसा’ घरी कसा तयार करायचा? याची मसालेदार अन् चिजी चव मन खुश करून टाकेल

यखनी पुलाव हा असाच एक खास प्रकार आहे, जो काश्मिरी पाककृतीतून आला आहे. “यखनी” म्हणजे सुगंधी मांसाचा रस्सा. यात मांसाला हळुवार शिजवून त्यातून तयार झालेल्या स्टॉकमध्ये भात शिजवला जातो. यामुळे भाताला अप्रतिम स्वाद आणि मांसाची खरी चव मिळते. यखनी पुलाव जास्त मसालेदार नसतो, पण त्याचा सुगंध आणि चव अतिशय श्रीमंती असते. फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांची खाद्यप्रेमी बाजू आपण नेहमीच ऐकतो. त्यात फराह खान या केवळ सिनेमॅकरच नाहीत तर उत्तम स्वयंपाक करणाऱ्या गृहिणी म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या स्टाईलमध्ये बनवलेला यखनी पुलाव हा घरगुती साधेपणासोबत स्टारडमची चव आणतो. मसाल्यांचा बेत, मांसाचे योग्य शिजवणे आणि भाताची परफेक्ट टेक्स्चर ही या डिशची खासियत आहे. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • बासमती तांदूळ – २ कप (अर्धा तास भिजवलेले)
  • चिकन/मटण – ५०० ग्रॅम
  • कांदा – २ (बारीक कापलेले)
  • आलं-लसूण पेस्ट – २ टीस्पून
  • हिरवी मिरची – ३ (चिरलेली)
  • दही – ½ कप
  • तमालपत्र – २
  • दालचिनी – १ तुकडा
  • वेलची – ३
  • लवंग – ४
  • मिरी – ५-६ दाणे
  • कोथिंबीर आणि पुदिना – मूठभर (बारीक चिरलेले)
  • मीठ – चवीनुसार
  • तूप/तेल – ३ टेबलस्पून
  • पाणी – अंदाजे ३-४ कप
दिवाळीनिमित्त घरी बनवा चविष्ट आणि कुरकुरीत मखाण्यांचा चिवडा, १५ मिनिटांमध्ये तयार होईल पदार्थ

कृती

  • यासाठी सर्वप्रथम कुकरमध्ये तेल/तूप गरम करून त्यात तमालपत्र, दालचिनी, वेलची, लवंग, मिरी टाका. त्यात आलं-लसूण पेस्ट, कांदा आणि हिरवी मिरची घालून परता.
  • त्यात चिकन/मटण टाकून हलके सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
  • फेटलेले दही, मीठ आणि थोडे पाणी घालून झाकण लावून मांस मऊ होईपर्यंत शिजवा. यामुळे यखनी (स्टॉक) तयार होईल.
  • दुसऱ्या भांड्यात तूप गरम करून त्यात भिजवलेला बासमती भात टाकून हलके परतून घ्या.
  • भातावर तयार यखनी (मांसाचा रस्सा) घाला. आवश्यक असल्यास पाणी वाढवा.
  • वरून चिरलेली पुदिना आणि कोथिंबीर शिंपडा. झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा.
  • भात मोकळा शिजल्यावर गरमागरम यखनी पुलाव रायता किंवा सॅलडसोबत सर्व्ह करा.
  • मटण वापरत असाल तर थोडा वेळ जास्त शिजवावा लागेल.
  • पुलाव खूप मसालेदार न करता सौम्य ठेवला की खरी यखनीची चव खुलते.
  • दही नीट फेटून घ्यावे म्हणजे ते फाटत नाही.

Web Title: Easy recipe for farah khans favorite dish yakhni pulao recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2025 | 02:40 PM

Topics:  

  • biryani
  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
1

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा
2

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी
3

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी
4

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.